जिपच्या सिंचन विभागातील लेखाधिकाऱ्याला १३ हजाराची लाच घटना अटक

0

जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत सिंचन विभागातील लेखाधिकारी सुरेंद्रकुमार आहिरे याला लाच घेताना आज दुपारी नाशिक एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

याबाबत सविस्तर असे की, जिल्हा परिषदमधील सिंचन विभागात काम करणाऱ्या लेखाधिकारी सुरेंद्रकुमार आहिरे याने ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी १५ हजाराची मागणी केली होती. परंतू ठेकेदाराने याबाबत नाशिक येथील लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीचे पथक सोमवारी (दि. १५) पासून जिल्हा परिषदच्या आवारात सापळा रचलेला होता. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ठेकेदाकडून तडजोडीअंती 13 हजाराची लाच घेतांना या पथकाने रंगेहात अटक केली. दरम्यान, या कारवाईमुळे जिल्हा परिषदच्या आवारात प्रचंड खळबळ उडाली आहे.

यांनी केली कारवाई
नाशिक विभागाचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कळासने, पो.नि. चंद्रकांत फालक, पो.ना. श्री. सपकाळे, प्रविण महाजन, पी.एच. पगारे यांनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.