Sunday, January 29, 2023

जारगाव येथील तरुण वर्ग धावला पुरग्रस्तांच्या मदतीला

- Advertisement -

पाचोरा | प्रतिनिधी

पाचोरा तालुक्यातील जारगाव हे गाव शहरा लगतच आहे. या गावातील तरुण हे व्हाॅलीबाॅल खेळात अग्रेसर आहेत. या  तरुणांनी एकत्रित येऊन सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. जारगाव येथुन मदतीसाठी हजारो हात पुढे येत आहेत. ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती जेमतेम आहे तो सुद्धा मदत देण्यासाठी पुढे येत आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातले. दोन जिल्ह्यातील शेकडो गावे पाण्यात बुडाली गरीब असो की श्रीमंत संकटाचा सामना करत आहे. पुरग्रस्तांची परिस्थिती आणि त्याची अवस्था बघून उभा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहिला. मात्र लक्ष वेधले ते पाचोरा तालुक्यातील जारगाव या खेडेगावातुन मदत फेरी काढुन प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे मदत करत नविन भांडे, नविन कपडे यासोबतच जीवनावश्यक वस्तु एक मदतीचा हात म्हणून देत आहे. छोटे मोठे दुकानदार, व्यापारी जमेल ती मदत करत आहेत. अनेक या मदतीच्या यज्ञात भर टाकत आहेत. जमा करण्यात आलेले साहित्य येथील “आधारवड” या सामाजिक संस्थेकडे जमा करण्यात येत असून ते साहित्य आधारवड चे पदाधिकारी हे कोल्हापूर येथे रवाना करणार आहेत.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे