Sunday, May 29, 2022

जामीन मंजूर होताच नारायण राणेंनी केलं पहिलं ट्वीट

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नारायण राणे यांना रात्री महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी राणे यांची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंने युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे.

- Advertisement -

तर जामिनावर सुटका झाल्यानंतर काही तासात राणेंनी पहिलं ट्वीट केलं आहे. केवळ दोन शब्दात राणेंनी ट्वीट केलं. खरंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. ‘सत्यमेव जयते’ असं दोन शब्दांचं ट्वीट राणेंनी रात्री 12.32 च्या सुमारास केलं आहे.

तसेच दुसरीकडे राणेंनी मोजक्याच शब्दात ट्वीट केलं असेल तर त्यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र पुन्हा एकदा शिवसेनेला डिवण्याचा प्रयत्न केला आहे.

नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयीच्या एका सिनेमातील सीन शेअर करत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे चॅलेज दिलं आहे. नारायण राणेंना जामीन नारायण राणे यांना गोळवलीमध्ये अटक केल्यानंतर महाड इथं आणण्यात आले. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

यावेळी, राणे यांचे कुटुंबीय सुद्धा न्यायालयात हजर होते. यावेळी पोलिसांनी राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. परंतु, नारायण राणे यांचे वकील अनिकेत निकम आणि भाऊ साळुंके यांनी युक्तिवाद केला. नारायण राणे यांचं वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या