जामनेर शिक्षणसंस्थेचा चेंज रिपोर्ट फेटाळला

0

सुरेश धारीवाल गटाला धक्का बसल्याची चर्चा

जामनेर(प्रतिनिधी):-जामनेर तालुका शिक्षण संस्थेद्वारा इ. सन.२००० साली दाखल करण्यात आलेल्या संपुर्ण संचालक मंडळाच्या चेंज रिर्पोटला अमान्य करून जळगावचे धर्मदाय आयुक्त श्री जोशी यांनी आज (३०) रोजी फेटाळला असल्याची माहिती  संस्थेचे सचिव जितु पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत दिली.

येथील शैक्षणीक क्षेत्रामधे नामांकीत अशा जामनेर तालुका शिक्षणसंस्थेमधे गेल्या अनेक दिवसांपासुन वाद सुरुआहे.आता धर्मदाय आयुक्तांच्या ताज्या निकालामुळे दुसऱ्या गटाचे सचिव सुरेश धारीवाल यांच्या शैक्षणीक संस्थेच्या कारकीर्दीला चांगलाच धक्का बसल्याचे समजण्यात येत आहे. ५९०/२००० नंबरने दाखल करण्यात आलेल्या चेंज रिर्पोटवर तत्कालीन सचिव नारायण देवचंद चौधरी व ईतर संचालकांनी हरकत घेतली होती.त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष आबाजीनाना पाटील होते.मात्र संस्थेने बहुतांश कामकाज पहाण्याचे अधिकार सुरेश मनोहर धारीवाल यांना देण्यात आले होते.घेण्यात आलेल्या हरकतीमधे सर्वांना सभेचे अजंडे दिलेले नाही बेकायदेशीर सभा असल्याने चेंज रिर्पोटच बेकायदेशीर असल्याचा युक्तीवाद करण्यात आला.हरकतदारांच्या वतीने अॅड दिलीप मंडोरे,अॅड रवींद्र बर्डे,अॅड नदीम पिंजारी यांनी काम पाहीले अशीही माहिती पत्रकार परीषदेत देण्यात आली.पत्रकार परीषदेला संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बाबुराव पाटील,संचालक दिलीप महाजन,अॅड शिवाजी सोनार,मुख्याध्यापक बि आर चौधरी,प्रवीण पाटील,कपील शर्मा आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.