जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेशातील लखिमपुर खीरी येथील शेतकरी आंदोलनावर केंद्रीय मंत्र्याच्या पुत्राने वाहन चालविल्याने त्यात अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले या घटनेचा म्हणुन महाविकास आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंद करण्यात आला होता.
महाविकास आघाडीच्या वतीने काल शहरातील व्यापाऱ्यांना बंद ठेवण्याबाबत सुचना व निवेदने देण्यात आली होती. आज सकाळपासुन महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यांवर फिरुन बंद ठेवण्याचे आवाहन करतांना दिसत होते. आघाडीच्या वतीने “जय जवान जय किसान” नारा देत घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.
बंदला कुठलाही अनुचित प्रकार किंवा गालबोट लागणार नाही यासाठी पो. नि. किरण शिंदे यांनी स्वःत हजर राहुन परिस्थिती सांभाळत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पोलीसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. तहसिलदार अरूण शेवाळे यांना महाविकासतर्फे निवेदन देऊन संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते संजय गरुड, युवा सेना जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. शरद पाटील, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, विलास राजपुत, प्रहार तालुकाध्यक्ष प्रदीप गायके, शंकर राजपुत, डॉ. प्रशांत पाटील, पप्पु पाटील, युनुस पठाण, भगवान पाटील, प्रल्हाद बोरसे, मनोज महाले, माधव चव्हाण, अतुल सोनवणे, अशोक चौधरी, मोहन चौधरी, मुसा पिंजारीं, गणेश झाल्टे, रऊफ शेख, विनोद माळी, भरत पवार, रशिद मुल्लाजी, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

