जामनेर शहरातील मोकाट जनावरे ठरताय वाहतुकीस डोकेदुखी

0

जनावरांच्या मालकांवर कारवाईची मागणी

जामनेर  प्रतिनिधी  : – शहरातील रस्त्यांवर बसलेली मोकाट जनावरे रहदारीस अडथळा ठरत असून नगरपालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

सध्या सगळीकडे रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून राज्यांचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांनी संपूर्ण शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा ध्यास घेतला आहे आणि त्याच अनुषंगाने शहरातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल असे चारही दिशेने शहरातील सर्व रस्त्यांची रुंदी वाढवून वाहतुकीचा प्रश्न मिटविला असून शहरातून मोठं-मोठी वाहने सहजरित्या वापरत आहेत.वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रस्त्याच्या मधोमध रस्ता दुभाजक (डिवायडर) टाकण्यात आलेले आहेत.राजमाता जिजाऊ चौक, गांधी चौक व भुसावळ चौफुली या तीन ठिकाणी नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते हि तीन ठिकाणे वगळता शहरात वाहतूक व्यवस्था अगदी सुरळीत आहे.मात्र जळगाव रोड,पाचोरा रोड व भुसावळ रोड वरील जामनेर पुरा या महामार्गावर रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे (गायी,म्हशी,बैल, बकऱ्या) बसलेली असतात,या  जनावारांमुळे अवजड वाहन चालकांना अक्षरशःजीव मुठीत धरून आपली वाहने चालवावी लागतात,प्रसंगी एखादे जनावर वाहनाखाली आल्यास अथवा मृत झाल्यास एखादा मोठा अनुचित प्रकार घडण्यास कारणीभूत ठरू शकतो असे मत सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केले जात आहे. नगरपालिकेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून कोंढवाड्यात टाकून या जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारून वाहतुक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी वाहनधारकांसह पादचाऱ्यांमधून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.