जामनेर(प्रतिनीधी):- लॉकडाऊन काळातील अव्वाच्या सव्वा आलेल्या वाढीव विजबिलाबाबत भारतीय जनता पक्षातर्फे तालुकाभरातील मोठ-मोठ्या शहरांमधे आंदोलन करण्यात आले,आणी आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन तहसीलदार अरूण शेवाळे यांना देण्यात आले.दरम्यान कोरोना काळातील जनतेची आर्थीक हलाखीच्या परीस्थितीला नजरेआड करून राज्यशासनाने अवास्तव विज बिलाचा शॉक दिला,उर्जामंत्र्यांनी आधी बिलामधे सवलत देण्याचे जाहीर करुन नंतर मात्र घुमजाव केले,हा जनतेचा विश्वासघात असुन आम्ही याचा निषेध करतो.आणी महाविकास आघाडी सरकारने लवकरात-लवकर सवलत जाहीर केली नाही तर यापुढे बिजबिलाच्या सवलतीबाबत यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशाराही यावेळी निवेदनाद्वारा देण्यात आला.
आंदोलनावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर,विलास पाटील,शिक्षणसंस्थेचे सचिव जितु पाटील,पालीकेचे उपाध्यक्ष अनीस केलेवाले,गटनेते डॉ प्रशांत भोंडे,महेंद्र बावीस्कर,श्रीराम महाजन, प्रा. शरद पाटील, पक्षाचे तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे,आनंदा लाव्हरे, आतीष झाल्टे,स्वियसहायक दिपक तायडे,संतोष बारी,सुहास पाटील,उल्हास पाटील,बाबुराव हिवराळे,कैलास नरवाडे,ज्ञानेश्वर शिंदे,शिवाजी शिंदे,संजय माळी,संजय सुर्यवंशी,फारूख मणीयार,रमाकांत पाटील,बाळु चव्हाण,शेख नाजीम,रिजवान शेख,विजय कल्याणकर,सुभाष पवार,गोपाळ नाईक,कैलास पालवे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी,विजग्राहक मोठ्यासंख्येने आंदोलनामधे सहभागी होते.
——————-