जामनेर-
भाजपा,शिवसेना,रिपाई,रासपा महायुतीच्या उमेदवार रक्षाताई निखिल खडसे यांच्या प्रचारार्थ जामनेर येथे आज भव्य रॅली काढण्यात आली.याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन,तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,ज्येष्ठ नेते शिवाजीनाना सोनार,छगनदादा झाल्टे,विस्तारक नवलभाऊ पाटील, पंस सभापती निताताई पाटील,शिवसेनेचे सुधाकर सराफ,सर्व नगरसेवक,महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.यावेळी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी मतदारांनी रक्षाताई खडसे यांचे स्वागत केले .