जामनेर येथे एसटी महामंडळातील वाहकाची आत्महत्या

0

भुसावळ रोड वरील एम.आय. डी.सी.मधील घटना – समलैंगिक संबंधांचा संशय 

जामनेर (प्रतिनिधी) : –  येथे एसटी महामंडळातील वाहकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान, काल याच भागात  रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. १२ तासात खुन व आत्महत्या अशा वेगवेगळ्या दोन घटना एकाच ठिकाणी घटल्याने पोलीसांसमोर एकाच आव्हान उभे राहिले आहे. या घटनांमुळे शहरासह तालुकाभरात चांगलीच खडबड उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की,शहरातील बजरंगपुरा भागातील रहिवासी संजय प्रभाकर चव्हाण वय २७ हा पण दि.१८ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भुसावळ रोड वरील नवीन औद्योगिक वसाहतीमधील टेकडी वरील दरीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आला होता. त्यांचा खुन झाल्याचा संशय पोलिसांना येत होता म्हणून या ठिकाणाहून अजून काही माहिती मिळते का म्हणून दि.१९ सोमवार रोजी सकाळी पोलीस घटना स्थळी पोहोचले.आजूबाजूचा परिसर पिंजून काढताना त्यांना घटनास्थळा पासून सुमारे ३०० मीटरच्या अंतरावर टेंभुर्णीच्या झाडाला खाकी गणवेशातील मृतदेह लटकलेला दिसला. मृतदेहाची तपासणी केल्यावर तो पुंडलिक शामराव पाटील यांचा असल्याचे निष्पन्न झाले.मृतदेह खाली उतरविल्या नंतर शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.मयत पुंडलिक पाटील हा तालुक्यातीलच सामरोद येथील मुळ रहिवासी असून जामनेर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात वाहक पदावर कार्यरत होता.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा असा परिवार आहे.बाळू सखाराम पाटील यांच्या खबरीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ५९/२०१९ नुसार नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.विलास चव्हाण करीत आहेत.घटनास्थळी श्र्वान व ठसे तज्ञांचे पथक बोलविण्यात आले असून वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

मयत दोघांमध्ये होते समलैंगिक संबंध
मयत संजय व पुंडलिक यांच्यात समलैंगिक संबंध होते.त्यातूनच संजयचा खुन झाला असावा असा प्राथमिक अंदाज समोर येत असून पुंडलिकचा खुन झाला की त्याने आत्महत्या केली यांचे गुढ मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पोलीसांसमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे.

संजयचा खुन झाला त्या दिवशी पुंडलिकची दिवसपाळीची डयुडी होती.डयुडीवर जातो असे घरी सांगून आला परंतु आपली तब्येत बरी नसल्याचा बहाणा वरीष्ठ अधिका-यांना सांगून तो आगारातून डयुडी न करता निघून गेला होता.मग तो दिवसभर कोठे होता असा प्रश्र्न ही यानिमित्ताने समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.