जामनेर प्रतिनिधी:
जामनेर मध्ये चोरट्यांनी एल. आय.सी.कार्यालयातून साडेपाच लाखाची रोकड लांबविली. शहरातील भुसावळ रोडवरील यश कॉप्लेक्सच्या तळमजल्यावर असलेल्या या कार्यालयातील शटरचे कुलुप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील साडेपाच लाखाची रोकड लांबविली व सिसीटीव्ही कँमेरा फोडला. हा प्रकार शनिवारी रात्री घडला, मात्र रविवारी सुटी असल्याने सकाळी कुणाला समजले नाही. दुपारी तळमजल्यावर गेलेल्या एकाच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्याने शाखा व्यवस्थापकांना कळविले. त्यांनी जामनेरला येवुन पोलिसांना माहिती दिली. सोमवारी सकाळी पोलिस निरीक्षक प्रतापसींग शिकारे यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. श्वान पथकाला बोलाविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात शहरातील पाच दुकाने चोरट्यांनी फोडले. त्याचा देखील तपास लागलेला नाही.

