जामनेर न्यायालयात अंजली दमानिया यांना हजर राहण्याचा आदेश

0

जामनेर | प्रतिनिधी
भाजपा नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कथित बदनामी केल्याप्रकरणी जामनेर येथील न्यायालयाने त्यांना प्रोसेस इश्यू केले असून त्यांना दि.२९ जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
तालुक्यातील शेंदुर्णी येथील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी उपजिल्हाध्यक्ष उत्तम राघो थोरात यांनी एकनाथ खडसे यांच्या बदनामी प्रकरणी जामनेर न्यायालयात अंजली दमानिया यांच्याविरुद्ध दि.१६ आॅगस्ट २०१६ रोजी फौजदारी खटला क्रमांक ४६०/२०१६ दाखल केला होता.
न्यायालयाने याप्रकरणी चौकशी करुन कागदपत्रांची तपासणी केली व युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर भा.दं.वि.कलम ४९९ व ५०० प्रमाणे मंगळवारी दमानिया यांच्याविरुद्ध प्रोसेस इश्यू जारी केले.यावेळी उत्तम थोरात यांच्याकडून अ‍ॅड.प्रदीप शुक्ला काम पाहत असून,त्यांना जळगाव येथील अ‍ॅड.व्ही.एच. पाटील मदत करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.