नगराध्यक्षपदी साधना महाजन विजयी ; २४ जागांवर भाजपाचे उमेदवारांचा दणदणीत विजय
* प्रथमच पालिकेत भाजपची एकहाती सत्ता
* विरोधकांना भाजप उमेदवारांनी चारली धूळ
* जामनेरकरांनी भाजपला एकहाती कौल दिला
जामनेर– जामनेर पालिकेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा संपूर्ण ‘जलवा ‘ दिसून आला असून थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत साधना महाजन या आठ हजार 418 मतांनी निवडून आल्या आहेत . काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रा.अंजली उत्तम पवार यांचा पराभव झालात्याचबरोबर भाजपाचे सर्वांच्या सर्व २४ जागांवर उमेदवार विजयी झाल्याने भाजपाच्या समर्थकांनी आज जल्लोष करत ढोल ताशांच्या दणदणाटात विजयी मिरवणूक काढून विजयाचा जल्लोष साजरा केला .दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संजय गरूड व पारस ललवाणी यांना जामनेरकरांनी साफ नाकारल्याने हि निवडणूक केवळ गिरीश महाजन यांच्या एकहाती प्रयत्नामुळे भाजपाला निवडून आणता येणे शक्य झाले आहे .
अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती . मात्र २४ जागांवर प्रथमच भाजपचे संपूर्ण उमेदवार निवडून आल्याने भाजपाची हि तिसऱयांदा एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे . गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस आघाडीने १४ जागा मिळवित सत्ता मिळविली होती. प्रथम अडीच वर्षे आघाडीचे पारस ललवाणी हे नगराध्यक्ष राहिल्यानंतर पुढील अडीच वर्षांनी साधना महाजन या आघाडीच्याच काही सदस्यांच्या पाठिंब्याने नगराध्यक्ष झाल्या होत्या. आता या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी पूर्ण शक्ती पणाला लावून सर्व २४ जागांवर विजय मिळवून दिला .
भाजपाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
लोकनियुक्त नगराध्यक्ष – साधना गिरीश महाजन. प्रभाग १ अ – प्रवीण सुधाकर नरवाडे, प्रभाग १ ब – ज्योती धोंडू पाटील, प्रभाग २ अ – बाबूराव उखर्डू हिवराळे, प्रभाग २ ब – किरण गणेश पोळ, प्रभाग ३ अ – रिजवान अब्दुल लतिफ शेख, प्रभाग ३ ब – रशीदाबी अमीरोद्दीन शेख, प्रभाग ४ अ – शेख अनिस शेख बिसमिल्ला, प्रभाग ४ ब – बतुलबी यासीन शेख (बिनविरोध), प्रभाग ५ अ – नाजीम वजीर शेख, प्रभाग ५ ब – मन्यार सुरय्याबी अब्दुल मुनाफ (बिनविरोध), प्रभाग ६ अ – आतीष छगन झाल्टे, प्रभाग ६ ब – शीतल दत्तात्रय सोनवणे, प्रभाग ७ अ – प्रमोद रवींद्र वाघ, प्रभाग ७ ब – सयाबाई माधव सुरवाडे, प्रभाग ८ अ – प्रशांत भागवत भोंडे, प्रभाग ८ ब – ज्योती जयेश सोन्ने, प्रभाग ९ अ – शरद मोतीराम पाटील, प्रभाग ९ ब – लीना सुहास पाटील, प्रभाग १० अ – उल्हास दशरथ पाटील, प्रभाग १० ब – मंगला सुधाकर माळी, प्रभाग ११ अ – महेंद्र कृपाराम बाविस्कर, प्रभाग ११ ब – संध्या जितेंद्र पाटील, प्रभाग १२ अ – रतन रामू गायकवाड, प्रभाग १२ ब – खान नजमुन्नीसाबी रमजान खान.