जामनेर : नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अनिस शेख यांनी पदाचा राजीनामा नगराध्यक्ष साधना महाजन यांच्याकडे सोपविला. उपनगराध्यक्ष पदावर वर्णी लागावी, यासाठी नगरसेवकांमध्ये स्पर्धा दिसून येत आहे. नगरसेवक प्रा. शरद पाटील, महेंद्र बाविस्कर व अतिश झाल्टे यांच्यातून एकाची उपनगराध्यक्ष पदासाठी निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेख यांनी सांगितले की, आमदार गिरीश महाजन यांनी अल्पसंख्य समाजाला तीन वर्षे उपनगरध्यक्ष पदाची संधी दिली. इतरांना संधी मिळावी, यासाठी स्वखुशीने पदाचा राजीनामा आपण साधना महाजन यांच्याकडे दिला आहे.