जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील खडकी ,माळपिंप्री आणि जामनेर शहरातील इंदिरा आवास भागातील तीन युवकांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यु झाला.रोशन विजय भोई वय २२ रा खडकी हा एस वाय बिसीएचे शिक्षण घेत होता,याचा शेतात शॉक लागुन जागीच मृत्यु झाला.ही घटना आज (१७) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. तर दुसऱ्या एका घटनेमधे शुभम ईश्वर गायकवाड वय २२ रा माळपिंप्री हा बुलेट दुचाकी घेऊन आपल्या शेताकडे जात असतांना औरंगाबाद-जळगांव हवे रोड वरील सूनसगाव फाट्या जवळ समोरून येणाऱ्या पियाजो रीक्षा क्र.mh 19 S 9468 ही रिक्षा नेरीहून शेंदुर्णी कडे भाजीपाला घेऊन जात असताना त्यांच्यात समोरा-समोर धडक झाल्याने शुभमला जबरदस्त मार बसल्याने त्याला जळगांव येथील आर्किड हॉस्पिटल ला नेत असताना मृत्यू झाल्याची घटना (१७) सकाळी दहा वाजता घडली. तर तिसरी घटना संध्या.७:३० वाजेला बोदवड वर दोन मोटार सायकलची समोरा समोर टक्कर होऊन त्यात गजानन विश्राम चौधरी वय.३५ हा जागीच ठार झाला.तर शेख बिलाल शेख मुसा मणियार वय २२ मुक्ताई नगर येथील रहिवाशी गंभीर जखमी झाला असून त्याला जळगांव येथे हलविण्यात आले आहे.तो जामनेर येथे लग्न कार्यासाठी असल्याची प्राथमिक माहिती आहे.तालुक्यातील तिन्ही घटना बघता तीन तरुणांसाठी आजचा दिवस घातवार ठरला आहे. पुढील तपास पोलीसांकडुन सुरू आहे.