जामनेर तालुक्यात ना.गिरीष महाजन यांचे जल्लोषात स्वागत

0

जामनेर : – राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री मा.ना.गिरीष महाजन यांची जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे.नियुक्ती झाल्यानंतर ना.महाजन प्रथमच काल दि.१० रोजी दूपारी जळगाव येथून जामनेरला येत असताना जामनेर शहरासह तालुक्यात  ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी व घोषणाबाजी करून,पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले.जामनेर येथे यावेळी खा.उन्मेश पाटील,आ.राजूमामा भोळे, कैलास सोनवणे,जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील,नगर परिषदेचे गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, पंचायत समितीचे गटनेते अमर पाटील,अॅड.शिवाजी सोनार,छगन झाल्टे, कमलाकर पाटील,नगरसेवक महेंद्र बाविस्कर,बाबुराव हिवराळे,कैलास नरवाडे,जयेश पाटील,सुहास पाटील,प्रा.शरद पाटील,दिपक तायडे,नितिन झाल्टे,राजू कावडीया,विलास पाटील,बाळू चव्हाण,खलील खान,परवेज खान,सुभाष पवार,रविंद्र झाल्टे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पळासखेडे बुद्रुक येथे पंचायत समितीचे गटनेते अमर पाटील,एल.ओ. पाटील,मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष विकास पाटील,माजी सरपंच संजय पाटील,कृष्णा साबळे,हेमंत पाटील,ग्रा.पं.सदस्य चिंधू डोईफोडे,जयंत पाटील,राजेंद्र शिंदे,अरूण पाटील,दिपक महाजन,राजेंद्र पाटील,नितिन पाटील,संभाजी साबळे,गजानन शिंदे,जीवन मगरे,सुभाष पाटील,युवराज शेळके,प्रशांत पाटील, किशोर इंगळे,श्रावण सोनवणे,हर्षल नेरकर,उदय पाटील,अक्षय शिंदे,योगेश पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.