तीन महिन्यात झाले पाच खून
जामनेर –
तालुक्यात माहे जानेवारी 2019 ते मार्च 2019 या तीन महिन्यात पाच जणांचे खून झाले असून यात तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.चारीत्र्याच्या संशयावरुन दोघा महिलांना जीव गमवावा लागला.तालुक्यात ङ्गक्राईम रेटफ वाढत असून तो चिंताजनक असल्याचे तालुकावासीयांमधून ऐकू येत आहे.
जानेवारी महिन्यात जळगाव न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या अॅड.राखी उर्फ विद्या पाटील यांचा पती डॉ.भरत पाटील यांनी चारित्र्याच्या संशयावरुन खून केला.त्यानंतर दुसर्याच महिन्यात दि.3 फेब्रुवारी रोजी जामनेर शहरातील पाचोरा रोड वरील खाजगी रुग्णालयात काम करणार्या परिचारिका मनिषा कोळी यांचाही चारीत्र्याच्या संशयावरुन पती अनिल कोळी यांने खून केला होता.दोन आठवड्यांनी पुन्हा दि.17 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील कासली येथील विधवा आशाबी साहेबू तडवी यांचा मालमत्तेच्या वादातून दीरानेच खून केला.
दि.3 मार्च रोजी तालुक्यातीलच नेरी बुद्रुक येथील संदीप पवार या तरुणाचा पत्नी कोमलने डोक्यात पेव्हर ब्लॉकने वार करुन निर्घूणपणे खून केला.त्यानंतर आता पुन्हा मार्च महिन्यात वाकडी येथील विनोद चांदणे या ग्रामपंचायत सदस्याचा राजकीय सुडाने खून झाला.