जामनेर तालुक्यात गरुड विद्यालयाचे 7 विद्यार्थी प्रथम

0

शेंदुर्णी :- आचार्य  ग.र.गरुड माध्य. वि. व क. महाविद्यालय शेंदुर्णी ता जामनेर इ. 10 वी परीक्षेत सर्वप्रथम कु. खुशी काबरा हिला 95.80टक्के गुण मिळवून जामनेर तालुक्यात सर्व प्रथम  येण्याचा मान मिळविला. तसेच बाकी सहा विद्यार्थी सुध्दा कु. चेतना महाले 94.80टक्के, कु. गौरी बारी 94.80टक्के, कु. प्रणिता श्रीकांत काबरा 94 टक्के ,किर्तेश पाटील 93.20 क्षितिज तोडकर 93 टक्के. कु. नेहा  उशिर 92. 80टक्के हे जामनेर तालुक्यातून आघारीवर आहेत. विद्यालयाचे 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे एकूण 12 विद्यार्थी व 80टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणारे 29 विद्यार्थी आहेत. आज रोजी सर्व 12 विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड व प्रमुख अतिथींच्या हस्ते पुस्तक, पेढा, पेन , गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये सर्व पालक माता भगिनी या प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन, संजयराव गरुड, संस्थेचे सचिव सागरमल जैन, यु.यु.पाटील, डॉ. किरण सुर्यवंशी, प्रा. डॉ. व्ही. आर पाटील , मधुकर यादव चौधरी, संजय पाटील सोयगाव, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक माता भगिनी, मुख्याध्यापक डी. आर. शिंपी, पर्यवेक्षक डी.बी. सुर्यवंशी तसेच सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन पी. जी. पाटील यांनी केले. व आभार डी.बी. सुर्यवंशी यांनी मानले. विद्यालयाचे ऋण आपल्या भाषणात पत्रकार दिपक जाधव, संजय पाटील, खुशी काबरा, कु. गौरी बारी, प्रणिता काबरा, किर्तेश पाटील  यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.