जामनेर | प्रतिनिधी
जामनेर तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने दररोज वेगवेगळ्या गावांमध्ये कोरोना चाचणी करण्यात येत आहे.आज ओझर येथे कोरोना चाचणी ही डॉ.पुमम डेपले, भगवान सुरवाडे, एम.डी.साळुंके,आशास्वयंसेविका शीतल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले. तसेच प्रशासनाकडून गावपातळीवर कोरोना चाचणी किट उपलब्ध करण्यात आलेले असूनमागील दीड ते दोन वर्षांपासून आरोग्य विभागाला कामाचा अतिरिक्त ताण अधिक प्रमाणात वाढला आहे.त्यातच काही अधिकारी, कर्मचारी
व आशा स्वयंसेविका कोरोना बाधित झाले किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य तरी कोरोना बाधित झाले तरीसुद्धा संबंधीत अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका थकवा किंवा अशक्तपणा असतांना कामावर रूजु होवुन कामकाज करीत आहेत.कोरोना चाचणी,कोरोना लसीकरण,गरोदर माता नोंदणी, उपचार, प्रसुती,जन्म नोंदणी, जननी सुरक्षा योजना, प्रधान मंत्री मातृ वंदना योजना, लहान मुलांचे नियमित लसीकरण, क्षयरोग, कुष्ठरोग,असंसर्गिक आजार इत्यादी कामे एकाच वेळी आरोग्य विभागाला करावे लागत आहे. तसेच मृत व्यक्तीच्या परिवाराच्या भावना लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत चोवीस तासात परिवारातील सदस्यांच्या कोरोना चाचण्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत. जसे शेंदूर्णी येथे 20,ओझर 24,पहुर 32,पाळधी 42 अश्या मृत व्यक्तीच्या परिवारातील लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी स्वतःहूनचाचणीसाठी पुढे यावे अंगावर न काढता चाचणी करून उपचार केल्यास नक्कीच मृत्यूचे प्रमाण कमी होईल. तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळदेवी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, नोडल अधिकारी डॉ. विनय सोनवणे,मुख्याधिकारी राहुल पाटील,साजित पिंजारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा पोलीस उपनिरीक्षक प्रताप इंगळे, राहुल खताड, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.के.पाटील,डॉ.जितेंद्र वानखेडे,डॉ.जयश्री पाटील व यांची सर्व टीमकडून निश्चितच या जागतिक महामारीत संसर्ग नियंत्रित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

