जामनेर तालुक्यात आरोग्य वर्धिनी ठरणार जीवन संजीवनी

0

रुग्णांना मिळणार 13 प्रकारच्या मोफत सेवा.

जामनेर ( प्रतिनिधी ) : –
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारा आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य वर्धनी केंद्राचा लोकार्पण सोहळा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे आँनलाईन पध्दतीने संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य कुटुंब कल्याण तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक आरोग्य,परिवहन कामगार राज्य उत्पादन शुक्ल राज्यमंत्री विजय देशमुख,डॉ. प्रदीपकुमार व्यास प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग,डॉ. अनुपकुमार यादव आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान,डॉ.सतीश पवार अतिरिक्त अभियान संचालक, डॉ.विजय कांदेवाड सहसंचालक तांत्रिक जिल्हा परिषदस्थर आरोग्य सेवा यांची उपस्थिती होती.जामनेर तालुक्यातील नागरिकांना उपचार मिळावेत यासाठी जामनेर तालुक्यातील सर्व उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र कायर्रत आहेत या केंद्राना आणखी बळकटी यावी यासाठी त्यांचे रूपांतर आरोग्य वर्धनी केंद्रात करण्यात आले आहेत. राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या पाठ पुराव्यामुळे जामनेर तालुक्यात 23 उपकेंद्रांना या योजेने अंतर्गत डॉक्टर उपलब्ध होणार असून सात आरोग्य वर्धनी केंद्राना अतिरिक डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.नेरी,गारखेडा, वाकडी,फत्तेपूर ,बेटावद, शेंदुर्णी, वाकोद या जामनेर तालुक्यातील केंद्राचा समावेश होता.प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्तर वाढवून त्यांचे आरोग्य वर्धनी केंद्रत रूपांतर करण्यात आले असून यामध्ये प्रसूती पूर्व,नवजात आभर्क व शिशु,बालक व किशोर वयीन तसेच लसीकरण,कुटूंब नियोजन इ प्रजनन संबंधी, सामान्य संसर्गा जन्य रोग व बाहय रूग्ण,संसंर्गजन्य रोग नियोजन,असंसंर्गजन्य तपासणी प्रतिबंधक नियंत्रण व नियोजन, मानसिक आरोग्य तपासणी,नाक कान घसा डोळे संबधी,दंत व मुख रोग,वाढत्या वयातील आजार,प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा,योगा व आयुवेद अशा 13 प्रकारच्या सेवा या केंद्रात मिळणार आहे.स्थानिक स्थरावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. कमलापूरकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हा परिषद सदस्या सरोजिनी गरुड,मा.उपसभापती घनशाम पाटील,सरपंच रत्ना खंडू पाटील, सरपंच माधव महाजन,सरपंच रामदास कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.जिल्हा लसीकरण एवंम माता बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, डॉ.पल्लवी सोनवणे,डॉ.नरेश पाटील,डॉ.गोत्तम खिल्लारे,डॉ. राहुल निकम,डॉ.वैशाली फेगडे, डॉ.सागर मावळे,डॉ.सागर पाटील,डॉ.प्रियंका कोंघे,आरोग्य कर्मचारी,पदाधिकारी,नागरिक, आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.