जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात नुकसान; कांग नदीला पुर

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात पावसाने प्रचंड थैमान घातले असुन त्यामुळे नुकसान खुप प्रमाणात होतांना दिसत आहे. अतिवृष्टीचा फटका हा जामनेर तालुकयाच्या कित्येक भागात मोठया प्रमाणावर घरांची पडझड झाली आहे . प्रथमच पावसाळ्यात शहरातुन जाणाऱ्या कांग नदीला भला मोठा पुर आला. अजिंठ्याचा डोंगराळ भागात प्रचंड पावसाने हजेरी लावल्याने तोंडापुर धरण ओफरफ्लो झाले.

त्यामुळे नदीला आज दुपारच्या वेळेस पुर आला. नदी दुफळी झाली असुन वाहतुक सध्या बंद करण्यात आली होती. जामनेर तहसिलदार अरुण शेवाळे यांनी जामनेर ते भुसावळ पुलावर पाणी वाहतांना भेट दिली. जामनेर पोलीसांनी पुरग्रस्त भागांमध्ये बंदोबस्त वाढवुन नागरीकांना पुराच्या पाण्याजवळ जायला मज्जाव केला.

डोळयाचे पारणे फेडणारा हा पुराचा प्रसंग असंख्य नागरीकांना मोबाईल मध्ये कैद केला. पुराचा प्रभाव ओसरला असुन पावसाचे वातावरण जैसे थे तसेच दिसत आहे.  प्रशासनाच्या वतीने नागरीकांना सुचना देण्यात आल्या आहेत की, डोंगर माथ्यावर होणाऱ्या पावसामुळे पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरीकांनी काळजी द्यावी .जेणेकरुन आर्थिक नुकसानी सोबत जिवीत हानी टाळता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.