जामनेर | प्रतिनिधी
तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या ११ जागा रिक्त होत्या.त्यापैकी ६ ग्रामपंचायतीचे ७ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.तर उर्वरित ३ ग्रामपंचायतीच्या ४ जागांसाठी दि.२३ रोजी निवडणूक घेण्यात आली होती.दि.२४ रोजी वाकी रोडवरील तहसिलदार कार्यालयात मतमोजणी करण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी निकाल जाहीर केले आहे.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवार मोयखेडा दिगर – प्रभाग क्रमांक १ – मोरे उत्तम रघुनाथ ( सर्व साधारण ) , पठाड तांडा – प्रभाग क्रमांक १ – नाईक मुन्नीबाई रमजान ( एस.टी.स्री ), सवतखेडा – प्रभाग क्रमांक ३ – कोळी सविता शांताराम (एस.टी.स्री ), नेरी दिगर – प्रभाग क्रमांक ४ – गोडवे दिपक पुना (एस.सी.), नाचणखेडा – प्रभाग क्रमांक १ – पटेल अ.सत्तार अ.मुनाफ (सर्व साधारण) , पटेल जावेदाबी अ.हमीद (सर्व साधारण स्री) गोंडखेल – प्रभाग क्रमांक १ – कोळी वैशाली प्रविण (एस.टी. स्री.) @ निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार व मिळालेली मते – कोदोली – प्रभाग क्रमांक २- सर्व साधारण स्री राखीव – बढे सुवर्णा अशोक (विजयी) १९५ , महाजन अनिता विजय १२९ – प्रभाग क्रमांक ३ – सर्व साधारण – काळे नामदेव उत्तम (विजयी) २१२ , मोतेकर प्रभाकर नामदेव -१९८ खडकी – प्रभाग क्रमांक २ – सर्व साधारण- नाईक वासुदेव आत्माराम (विजयी) १९७, नाईक रामकिशन दुधासिंग १४२ , नाईक श्रीधर देवा ११७ – मालखेडा प्रभाग क्रमांक १ सर्व साधारण – नाईक करतार मोतीराम (विजयी) ३१० , नाईक नवल बदलली १९८ सर्व विजयी उमेदवारांवर गावातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून मतमोजणी दरम्यान जामनेर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.