जामनेर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर

0

जामनेर | प्रतिनिधी
तालुक्यातील जंगीपुरा व वाकी खुर्द या दोन ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्यामुळे दि.२४ रोजी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती.त्यांची मत मोजणी काल दि.२५ रोजी तहसिलदार कार्यालयात सकाळी ११ वाजता करण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात आले.यात वाकी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदाचे उमेदवार सुधाकर सुरवाडे हे ५१४ मते मिळवून विजयी झाले.तर सदस्य म्हणून ईश्वर तेली – ११४, सीमा सरताळे – १८०,बापू पाटील – २२१, कविता संदीप झलवार – २४५, आरती तेली – १९१ तसेच अंबादास नरवडे,पूनम ढाकरे हे दोन सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत.
जंगीपुरा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी कविता राजपूत – ४७२ मते घेऊन विजयी झाल्या तर सदस्य सागर पाटील – ११७, रेखा राजपूत – १२८, सुनील राजपूत – १४२, कल्पना राजपूत – १४६, अरुण मोरे – २१९, शीला राजपूत – १९५, सुनंदा घोडके – १८८ यांना विजयी घोषित करण्यात आले.सर्व विजयी उमेदवारांचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या निवासस्थानी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.त्यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील,माजी पंचायत समितीचे सभापती छगनराव झाल्टे,संतोष बारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.