Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
जामनेर (प्रतिनिधी): – येथील एम आय डी सी एरिया तील गट न.65ते गट न.68 मधील महाराष्ट्र स्क्रॅप व रोशन प्लॅस्टिक ह्या भांगरच्या गोडाऊन ला काल संध्या.7 ते 8 च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली असून सुदैवाने जीवित हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.त्याचे सविस्तर असे शहराच्या जवळच नवीन शिगाईत गावाजवळ एम आय डी सी एरिया मध्ये शहरातील भंगार व्यापारी असीम अब्दुल गफार यांनी गोडाऊन भाड्याने घेतलेले होते. त्याठिकाणी त्याचे भगारचे मोठ्या प्रमाणात साहित्य होते त्यात मोठ्या प्रमाणात टायरांचा साठा होता. भंगारच्या ठेवलेल्या सामानाच्या वरून इलेक्ट्रिक तार गेलेले होते. इलेक्ट्रिक ता रान मधून ठिणगी पडल्याने आग लागल्याचे तेथील जवळ पास राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे. आगीत तेथील बऱ्याच प्रमाणात भगारचे साहित्य जळून खाख झाले असल्याचे समजते. स्थानिक लोकांनी जामनेर नगर पालिकेच्या आग्नि शामक दलाला पाचारण केल्या मुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले. त्यामुळे आग पसरून मोठा अनर्थ टळला आहे.