जामनेर ( प्रतिनिधी ) : – येथील जळगाव रोडवरील शासकीय आय.टी.आय जवळ ओम्नी व्हनला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाल्याची घटना दि.६ रोजी रात्री ९-३० वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की,योगेश मधुकर पाटील वय ३५ , दिपाली योगेश पाटील वय ३०,प्रतिभा सुशिल पाटील वय ३९ , कल्पना ज्ञानेश्वर पाटील वय ५५,ज्ञानेश्वर जिवबा पाटील वय ६०, हार्दिक योगेश पाटील वय ३ सर्व रा.मादणी ता.जामनेर व लक्ष्मीबाई गंगाराम पाटील वय ६० रा.तळेगाव ता.जामनेर हे मारोती ओम्नी नंबर एम एच १९ सी एफ ५५१८ मध्ये बसून जळगावहून ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलाच्या लग्नाची खरेदी आटोपून जामनेर कडे येत होते.त्यांच्या मागून धुळे जिल्ह्यातील फागणे येथून जामनेरला माल भरण्यासाठी ट्रक नंबर एम एच १८ बी जी ८६२९ येत होती.आय टी आय जवळील स्पीड ब्रेकर वर ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने समोर चालणा-या ओम्नीला मागून जोरदार धडक दिल्याने ओम्नी पलटी झाली.त्यात लक्ष्मीबाई गंगाराम पाटील यांच्या जागीच मृत्यू झाला असून ज्ञानेश्वर जिवबा पाटील व कल्पना ज्ञानेश्वर पाटील यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर बाकी जखमींवर जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आलेले आहेत.मद्यधुंद ट्रक चालकासह पोलीसांनी दोघ वाहने ताब्यात घेतले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, सुनिल कदम, राहुल पाटील, ईस्माईल शेख घटनास्थळी दाखल झाले होते.