जामनेरात ३० वर्षीय युवकाचा निर्घुण खून

0

जामनेर (प्रतिनिधी) : – येथील भुसावळ रोड वरील नवीन औद्योगिक वसाहतीत टेकडीच्या दरीमध्ये शहरातील बजरंगपुरा भागातील रहिवासी संजय प्रभाकर (नाना) चव्हाण वय ३० यांचा निर्घुण खुन झाल्याची घटना दि.१८ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.घटना घडली त्या टेकडीवर जामनेर पुरा भागातील रहिवासी संध्याकाळी फिरण्यासाठी जात असतात.त्या नागरीकांना संजयचा मृतदेह दिसला.

झालेल्या घटनेची वार्ता शहरात पसरल्याने घटनास्थळी बघ्याची एकच गर्दी झाली.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, उपनिरीक्षक विकास पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले.नगरसेवक बाबुराव हिवराळे,धोंडू आप्पा पाटील,आतिष झाल्टे, कैलास पालवे हेही घटनास्थळी थांबून होते.मयत संजयच्या पश्चात आई व ४ बहिणी असून तो घरातील कमविता कर्ता पुरुष होता. संजयच्या अशा एकाकी जाण्याने त्यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या आईने हंबरडा फोडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.