जामनेरात विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी दिले तहसीलदारांना निवेदन

0

जामनेर( प्रतिनिधी ):- तालुक्यातील शिक्षक कर्मचार्यांची covid-19 अंतर्गत पॉझिटिव्ह रुग्ण शोधमोहीम या उपक्रमात नियुक्ती केलेली असून सदर राष्ट्रीय आपत्तीत सर्व शिक्षक कर्माच्यारी प्रशासनाला मदत करण्यासाठी सकारात्मक असल्याचे निवेदन आज दीं.२५ रोजी तालुक्यातील शिक्षक संघटनेने तहसीलदार अरुण शेवाळे यांना दिले असून त्याबाबत काही मागण्या निवेदनातून केल्या आहेत.त्यात , पॉझिटिव्ह रुग्ण शोधमोहीम सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची लसीकरण प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी प्रथम करण्यात आली आहे.

तसेच बरेच शिक्षक बंधू-भगिनी कोरोना पॉझिटिव्ह  असल्याने त्यांना या मोहिमेतून वगळण्यात यावे. तसेच कोरोना काळात तालुक्यातील शेकडोंच्या वर शिक्षक करुणा बाधित झाले आहेत .त्यांना शासन निर्णयाप्रमाणे संसर्ग टाळण्यासाठी किमान 14 दिवस कोरोनटाईन राहावे लागते. त्या काळातील रजा ही कर्मचारी खात्यातून शिलकी असलेली  राजा अर्जित रजा म्हणून ग्राह्य धरली जावी. अशी तोंडी सूचना आहेत.

एखाद्या कर्मचाऱ्याच्या खाती रजा शिल्लक नसेल तर सदरील आपत्तीच्या काळात त्यांचे वेतन देखील कापले जाणार आहे. त्यामुळे निवेदनाद्वारे शासन स्तरावर अर्जित रजा खर्ची न घालता ती कर्तव्य रजा म्हणून ग्राह्य धरली जावी. तसेच पॉझिटिव्ह रुपये शोध मोहीम अंतर्गत आमच्या कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये करिता आरोग्य प्रशासनाला हेल्मेट ,पी पी ई किट व इतर साहित्य पुरविणे बाबत आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन शिक्षक संघटनेने तहसीलदार अरुण शेवाळे यांना सादर केले. यात जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष सोपान पारधी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पाटील ,पंडित बावसकर ,प्राथमिक शिक्षक संघ जामनेर सरचिटणीस किरण युवराज पाटील प्रदीप सोनवणे ,विशाल पाटील, रमेश पाटील ,संतोष ठाकूर ,आधी शिक्षक बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.