जामनेरात मतदानाविषयी जनजागृती

0

आपल्या देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. अशा या भारत निवडणूक आयोगाची स्था‍पना 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने जामनेर तालुक्यात तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. हे. या निमित्ताने तालुक्यात विविध स्पर्धा, जनजागृतीचे कार्यक्रम ही शालेय, महाविद्यालयीन पातळीवर आयोजित केलेले आहेत.

तालुका व गांव स्तरावरही पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्याह निद्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वीप-२ कार्यक्रम

आपणास माहितच आहे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने स्वीप-2 (SVEEP-II) हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. आयोगाने मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी काही उद्दिष्ट समोर ठेवली आहेत. एकूण लोकसंख्येमधील मतदारांचे प्रमाण व 18 वर्षावरील मतदारांची संख्या ही समान असावी यासाठी उपक्रम राबवून ती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. मतदारांच्या नोंदणीचे प्रमाण का कमी आहे याची कारणे शोधून त्यामध्ये लक्ष घालणे अपेक्षित आहे.

भारत निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. एकूण लोकसंख्येमधील महिलांचे प्रमाण आणि मतदारांमधील महिलांचे प्रमाण सारखे असावे. हे प्रमाण वाढविण्यासाठी महिला बचत गट, अंगणवाडी केंद्र, दूध उत्पादक सहकारी संस्था तसेच महिलांच्या सामाजिक संघटना, नागरी संस्था इत्यादी सोबत चर्चा, परिसंवाद, मेळावे आयोजित करण्यात येत आहे.

शहरी क्षेत्रामध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे शहरी क्षेत्रामध्ये उदासिनतेमुळे मतदानाचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी शहरी क्षेत्रात मतदान कमी होण्याची नेमकी कारणे शोधून काढून त्यासंबंधी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी शहरी भागात संतोष सराफ व सहकारी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. यात कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भीड पणे मतदान करावे, मतदान केंदावर पाळणा घर, मतदार मदत कक्ष तसेच मतदारांसाठी मंडप व सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. या विषयांना अतिशय विनोदी व प्रबोधनात्मक रित्या माडले जात आहे. गांव गांव त या अभियानास उस्पुर्त प्रतिसाद मिळत आहे.

वंचित समाज/समुह यांची मतदार संख्या वाढावी आणि मतदानामध्ये त्यांचा सहभाग वाढावा. यासाठी आपल्या सर्वांच्या विशेष प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन यावेळी डॉ. अविनाश ढाकणे जिल्हा अधिकारी जळगांव, गोरक्ष गाडीलकर निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्या कडून करण्यात येत आहे.

पथनाट्याच्या माध्यमातून जामनेर तहसील कार्यालयाच्या वतीने जनजागृती लोकशाही व्यावस्थेमध्येच भयमुक्त व निःपक्षपाती वातावरणात निवडणूका पार पडणे अत्यंत महत्वाचे व आवश्यक आहे. भारतीय लोकशाहीला उज्वल परंपरा आहे. या अभियानाने मतदारामध्ये जनजागृती व प्रबोधन होण्यास मोलाची मदत होईल. व भारतीय लोकशाही अधिक सक्षम, बळकट व लोकाभिमुख होईल.

– नामदेव टिळेकर (तहसीलदार जामनेर )

Leave A Reply

Your email address will not be published.