जामनेर(प्रतिनिधी):- येथील ‘आनंदयात्री’ परिवारातर्फे शहरात प्रथमच दि.२१ ते २३ फेब्रुवारी अशा तिनं दिवशीय लज्जतदार अस्सद खाद्य आणि दमदार वाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात संध्याकाळी ६ ते १० वाजेपर्यंत सर्वांना खुला प्रवेश दिला जाणार आहे. या महोत्सवात विविध नाविन्यपूर्ण शाकाहारी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात येणार असून वाद्य. संस्कृतीची ओळख होण्यासाठी भव्य रंगमंचावर विविध लोककलेचे सादरीकरण होणार आहे.
शहरातील रसिक आणि खवय्ये यांसाठी महोत्सव एक पर्वणी ठरणार आहे.या महोत्सवात सहभागी होण्यासाठी दि.१५ फेब्रुवारी पर्यंत डॉ.चंद्रशेखर पाटील धन्वन्तरी हॉस्पिटल,डॉ.अमोल सेठ संजीवनी हॉस्पिटल,सुहास चौधरी पत्रकार,डॉ.आशिष महाजन, प्रा.सुधीर साठे,गणेश राऊत यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी व नवं नवीन पदार्थ बनविण्याची आवड असणाऱ्या महिला,बचतगट व इच्छूकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.