ना.गिरीष महाजन यांनी धरला लेझीमच्या तालावर ठेका
जामनेर | प्रतिनिधी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काल दि.१४ रोजी जामनेर शहरासह तालुकाभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील भिमनगरमधून निघालेल्या मिरवणूकीत राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री मा.ना.गिरीष महाजन यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यावेळी भिम अनुयायी लेझीम खेळतानाचे पाहून ना.महाजन यांनाही लेझीम खेळण्याचा मोह टाळता आला नाही.त्यांनीही लगेच हातात लेझीम घेत भिम गीतावर ठेका धरला व नृत्य ही केले.ऐवढेच नाही तर त्यांनी यावेळी ट्रॅक्टर ही चालविले.त्यावेळी त्यांच्या समवेत जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरपालीकेचे गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,नगरसेवक बाबुराव हिवराळे,कैलास नरवाडे,सुधाकर माळी,समाधान वाघ,अरूण जाधव,सदाशिव माळी,संदीप वाघ,राहुल इंगळे यांच्यासह असंख्य नागरीक उपस्थित होते.
येथील पंचायत समिती कार्यालयात सभापती निता पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यावेळी गटनेते अमर पाटील,गटविकास अधिकारी अजय जोशी,कक्ष अधिकारी के.बी.पाटील,कमलाकर पाटील,विनोद पाटील,अण्णा पिठोडे,डॉ.पल्लवी सोनवणे आदिंसह पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.श्री.इंगळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यास उजाळा दिला.यावेळी पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील,हेड कॉन्स्टेबल सुभाष माळी,पोलीस नाईक सुनिल माळी,ईस्माईल शेख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.