Sunday, January 29, 2023

जामनेरात अवैध दारू अड्डयावर पोलिसांचा छापा

- Advertisement -

जामनेर | प्रतिनिधी 

जामनेर तालुक्यातील अनेक ठिकाणी पोलीसांनी अवैध प्रकारच्या गावठी हात भही दारुच्या अड्डयावर धाड टाकीत लाखो रुपयांचा मुद्देमाल उध्वस्त करण्यात आला . सविस्तर वृत्त असे की जामनेर पो. स्टे ला नव्याने पदभार घेऊन आपल्या विशिष्ट कार्यपद्धतीने कित्येक किचकट गुन्हयांसह इतर गुन्ह्यांचा योग्य प्रकारे छडा लावुन  अवैध धंदे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून सर्व सामान्यांना न्याय देणारे कर्तव्य दक्ष पो . नि . किरण शिंदे यांनी सुत्रे हातात घेताच अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले .मा . जिल्हा पो . अधिक्षक प्रविण मुंडे यांच्या आदेशाने जामनेर तालुक्यातील नेरी दुरक्षेत्र व शहापुर बिट हद्द, तसेच खादगांव बिट हद्दीत अप्पर पो. अधिक्षक रमेश चोपडे त्याच प्रमाणे पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पो. स्टेचे पोनि किरण शिंदे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरु असलेल्या भवैध प्रकारच्या  गावठी हात भट्टीच्या अड्डयावर छापा टाकीत सुमारे ५६०० रु किलोचे ३४०० लिटर मोहगुळ मिश्रीत कच्चे रसायन व १०० लिटर उकळते रसायन तसेच ३५ लिटर हात भट्टीची तयार दारु भागदारा शिवारातील उंबर नाल्याच्या काठावर धाड टाकुन दादाराव रामदास जोगी व राहुल नाना जोगी दोन्ही  रा . भाग दारा यांना ताब्यात घेण्यात आले . तसेच माळपिंप्री येथे ३८९०० रु किमतीचे १६०० लिटर गुळ मिश्रीत कच्चे रसायन व १५०लिटर उकळते रसायन १५ लिटर गावठी दारू सह एक बजाज प्लॅटीना दुचाकी व आकाश दिपक जाधव यांस ताब्यात घेण्यात आले . हिवरखेडा येथील अनिल बाजीराव पाटील व दिनकर दगडु बोरसे यांच्या कडुन १२४८ रु किमतीच्या देशी दारुच्या २४ बाटल्या जप्त करण्यात आल्या .सदर संपुर्ण टाकलेल्या धाडीत सुमारे ९६१४८ रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला आहे . या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांच्या पायाखालची वाळु पुरती सरकली आहे . या धाडसी मोहिमेत स .फौ . संजय पाटील, पोहे .कॉ. सुनिल राठोड, विलास चव्हाण, विजय जोशी, पोना . राहुल पाटील, अतुल पवार, संदिप सुर्यवंशी, हंसराज वाघ, जितेंद्र ठाकरे, निलेश घुगे, तुषार पाटील, यांच्या विशेष पथकाने उत्कृष्ठ कामगीरी बजावली .

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे