जामनेरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – ना.गिरीष महाजन

0

पोलीस स्टेशनतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन

जामनेर :- आज गल्ली ते दिल्ली पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता असून सरकार जातीपातीचे राजकारण न करता सर्वांना समान न्याय देण्याचे काम करीत आहे. सर्वसामान्य जनतेला सर्व मुलभूत सुविधा मिळणार असून जामनेरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना. गिरीश महाजन यांनी पाचोरा रोडवरील बाबाजी राघो मंगल कार्यालयात पोलीस स्टेशनतर्फे आयोजित इफ्तार पार्टीत केले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले,पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे,तहसीलदार नामदेव टिळेकर,जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील,नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अनिस शेख,गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,नगरसेवक महेंद्र बाविस्कर,नाजीम शेख,पुखराज डांगी,उल्हास पाटील,श्रीराम महाजन,बाबुराव हिवराळे, कमलाकर पाटील,न्याज मोहम्मद,खलील शेख,प्रफुल्ल लोढा,मुस्ताक खान,सुधाकर माळी आदी मान्यवर उपस्थित होते.पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले व शेख शकील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे, पहुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.के.शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील,सुनील कदम,सुभाष माळी,सुनील माळी,अशोक चौधरी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप इंगळे यांनी तर सूत्रसंचालन राजेश काळे आणि आभार प्रदर्शन विकास पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.