जामनेर – लालपरी म्हणून ओळखली एस.टी.बसचे जाळे शरीरातील रक्तवाहिन्या सारखे खेड्यापाड्यात पर्यंत पोहचले असून आपल्या जीवनात एस. टीचे अन्यन महत्त्व आहे.जामनेर येथे सुरु असलेल्या अध्यावत अशा बसपोर्टचे काम पुर्णत्वास असून लवकरच ते प्रवाशांसाठी खुले होणार आहे असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री मा.ना.गिरीष महाजन यांनी दि.1 जून रोजी जामनेर येथील बसस्थानकावर आयोजित कार्यक्रमात केले.दि.1 जून रोजी महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त ना.महाजन यांनी जळगाव ते जामनेर असा एस. टीने प्रवास केला.
प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांकडून समस्या जाणून घेतल्या.ना.महाजन जामनेर बस स्टॅण्डवर आले असता एस.टी.महामंडळाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.त्यानतंर ना.महाजन यांच्या हस्ते एस.टी.बसचे पुजन करण्यात आले.त्यानतंर त्यांनी प्रवाशांना व महामंडळाच्या अधिका-यांना पेढा भरवून वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.त्यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील,नगरपालीकेचे उपनगराध्यक्ष अनिस शेख,गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,नगरसेवक महेंद्र बाविस्कर,बाबुराव हिवराळे, आतिश झाल्टे,प्रा.शरद पाटील, श्रीराम महाजन,अशोक नेरकर, दिपक तायडे,अरविंद देशमुख, मनोहर माळी,सदाशिव माळी, जालमसिंग राजपुत,पोलीसक्षक प्रताप इंगळे,दिलीप मराठे यांच्यासह एस.टी.महामंडळाचे अधिकारी,कर्मचारी, प्रवाशी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.