जळगाव-दिलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामधील तावसे बु या ग्रामपंचायतिचे चार सदस्यांवर जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी ११फेब्रुवारी मंगळवार या दिवशी अपात्रतेची कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे कि तावसे बु येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१७ या वर्षी झाली होती,यामध्ये हुकूमचंद धनसिंग कोळी,(अ ज )पुरुष मतदार संघ,विजया काशिनाथ शिंदे (अ जा )महिला राखीव,मीराबाई सुरेश चौधरी (महिला ओबीसी ),बाळकृष्ण बळीराम पाटील (ओबीसी पुरुष )या मतदारसंघातून निवडणूक लढविली असता मात्र त्यांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते म्हणून त्यांच्याविरुद्ध प्रभाकर धनसिंग शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्याकडे ६ ऑगस्ट २०१९ रोजी तक्रार दाखल केली असता ,त्यामुळे चार सदस्यांना अपात्र केले गेले, सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून विधी लेखाधिकरी ऍड हरुल देवरे यांच्याकडून मिळाली .
Trending
- एमआयडीसी पोलीस ठाण्याचा कारभार ‘राम’ भरोसे!
- नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
- राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
- अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
- अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
- दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
- सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
- भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!
