चाळीसगाव-
आज देशात दोन विचारधारांची निवडणूक आहे एक विचार देशात जाती जाती मध्ये बखेडा उभे करून समाजा मध्ये भिंतीचे वातावरण निर्माण करीत आहे, आणि एक विचार सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन देशाची अखंडता टिकून राहण्यासाठी वेळेप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे,अशा धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पाठीशी आपण गंभीर पणे उभे राहिले पाहिजे असे ठामपणे मालेगाव कांग्रेस पक्षाचे आमदार शेख आसिफ शेख रशीद यांनी जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस,आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या चाळीसगाव येथील हुडको परीसरात प्रचारसभेच्या वेळी आपले विचार मांडले
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष गफ्फार मालीक यांनी आपले विचार मांडताना संगितले की,भाजपाने मुस्लिम समाजातील स्त्रिया आणि पुरूषा मध्ये तीन तलाकच्या मुद्दा वरून भांडण लावण्याचे शाप केले आहे,अशा अनेक मुद्द्यांवर शेरेबाजी केली, चाळीसगाव चे माजी आमदार राजीव देशमुख, जळगाव जिल्हा कोळी महासंघाचे अध्यक्ष आण्णासाहेब कोळी, नगरसेवक रामचंद्र जाधव, विनोद देसले यांचीही भाषणे झाली, सभेच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव शहर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक हाजी गफ्फूर पहेलवान होते,
यावेळी व्यासपीठावर कांग्रेस पक्षाचे नेते अशोक खलाणे रमेश शिंपी, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, नगरसेवक फकिरा मिर्जा, शेखर देशमुख,श्याम देशमुख, भगवान पाटील,अग्लो उर्द हायस्कूल चे चेअरमन इक्बाल कुरेशी,आदी मान्यवर उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.