जाणून घ्या.. 1 कप धण्याच्या पाण्याचे महत्त्व; ‘हे’ होतील फायदे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आपल्या भारतीय संस्कृतीला आयुर्वेदाचा एक अनमोल असा ठेवा लाभलेला आहे. यामुळे मानवी आरोग्य सुदृढ होऊन अनेक गंभीर स्वरूपाचे आजार- रोग दूर होण्यास मदत मिळते. आज आपण अशाच एका पदार्थाविषयी जाणून घेणार आहोत. जो अगदी सहजरित्या भारतीय स्वयंपाकघरात उपलब्ध होतो.

धण्याची पूड हा भारतीय स्वयंपाकघरात  सहज मिळणारा पदार्थ  आहे. तर धन्याची पाने अर्थात कोथिंबीर आपण खाद्यपदार्थांमध्ये हमखास वापरतो. मात्र धण्याचे पाणीही आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. तर मग जाणून घेऊया..  हे पाणी कसे तयार करावे आणि  हे सेवन कसे करावे तसेच याचे काय फायदे आहेत.

 धण्यामधील पोषक घटक

धण्याच्या पाण्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, जीवनसत्त्व क आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळते आणि या सर्व तत्त्वांमुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात.

 धण्याचे पाणी असे  तयार करावे 

आयुर्वेदात सांगितले आहे की,  आपण जिरे, धणे, मेथीचे दाणे आणि काळी मिरची रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी यात लिंबू आणि मध मिसळा. आता रिकाम्या पोटी हे पाणी प्या. जर आपल्याला यातले जिरे, धण्याचे दाणे, मेथी, काळी मिरची खायची नसेल तर आपण हे पाणी गाळून घेऊ शकता.

 धण्याच्या पाण्याचे फायदे

धण्यातले गुण हे वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी सहाय्यक असतात. धण्याचे पाणी शरीराचा मेटॅबॉलिजम नियंत्रणात ठेवते ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. धण्याच्या पाण्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. या पाण्यातील अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यात मदत करतात. ज्यामुळे रोग होण्याचा धोका कमी होतो. हे पाणी पिण्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करता येते. यामुळे शरीरातील पाणी योग्य प्रमाणात राखले जाते आणि शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. धण्याच्या पाण्यामुळे आपली पाचनक्रिया चांगली राहते. पचनाशी संबंधित समस्या दूर राहतात. धण्याचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.