जागर प्रतिष्ठान राबविणार वृक्ष दत्तक योजना

0

मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात १०० वृक्षांची करणार लागवड

भुसावळ :- वृक्षांना प्रियाजनांचे वाढदिवस, स्मृतिदिन, थोर महात्मे किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानांची दिली जाणार नावे वाढलेले तापमान आणि घटलेली भू – जल पातळी हा आजचा ज्वलंत प्रश्न आहे. या करिता मानवी उपयोजन कृती आवश्यक आहे.

यावर असलेल्या अनेक उपायांपैकी एका अर्थात वृक्षारोपण उपक्रमावर जागर प्रतिष्ठान, भुसावळ तर्फे गो ग्रीन भुसावळ  (Go Green Bhusawal) असे ब्रीद घेवून भुसावळ शहरात वृक्षारोपण करणार आहे. प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी 5 जून पर्यावरण दिना निमित्त आपला हा निश्चय व्यक्त केला.  पहिल्या टप्प्यात होणाऱ्या १०० वृक्ष लागवडी साठी १०० वनश्री पालकांची यादी देखील प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी भर उन्हात फिरून संकलित केली आहे.  यात प्रत्येक झाड जगले पाहिजे म्हणून मोहिमेतील अनेक वैशिष्ट्ये आहेत.

वृक्ष दत्तक योजनेत, वृक्ष पलकास दत्तक प्रमाणपत्र, संरक्षण व संवर्धनाची शपथ, संरक्षक जाळी वर वृक्ष पालकाचे नाव व दात्याचे नाव असेल तर वृक्ष संरक्षणार्थ स्वयम् सेवकांची ग्रीन आर्मी स्थापन देखील करण्यात येईल. योजना अमलात येण्या करिता प्रती वृक्ष  ४०० रू. निधी ( जाळी, खड्डा, झाड ई. ) ठरविण्यात आला आहे. पर्यावरण प्रेमी आपले वाढदिवस, प्रियजन यांच्या नावे,  थोर विचारवंत, समाजसुधारक व हुतात्मे यांच्या जयंती – पुण्यतिथी , वडीलधारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त किंवा व्यावसायिक – उद्योजक जाहिरातीसठी निधी देवू  शकता. किंवा शहरातील नगरे व  कॉलनी परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जागर प्रतिष्ठान चे प्रकल्प प्रमुख पवन पाटील, अध्यक्ष प्रा पंकज पाटील, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, सचिव प्रा निलेश गुरूचल, सहसचिव हरेशकुमार पाटील, कोषाध्यक्ष हृषिकेश पवार , संचालक गोकुळ सोनवणे, ग्रीन आर्मी समन्वयक भूषण कुलकर्णी व पवन फालक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पर्यावरण प्रेमींनी ९४२२६१०६१० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.