वरणगांव आयुध निर्माणीत संवाद २०२० कार्यक्रमाचे आयोजन
वरणगाव आयुध निर्माणी बोर्डातर्फे राष्ट्रीय रक्षा उत्पादन अकादमी अंबाझरी येथे बोर्ड चेअरमन हरी मोहन यांच्या अध्यक्षतेखाली संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , या अनुषंगाने वरणगाव आयुध निर्माणीत ही महाप्रबंधक एस चटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागात संवाद २०२० हा कार्यक्रम घेण्यात येत आहे .
इन्सास केस विभागापासुन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला कार्यक्रमात महाप्रबंधक एस चटर्जी , अप्पर महाप्रबंधक राजीव गुप्ता , पी .पी जगदाळे , उपमहाप्रबंधक नाईकनवरे , कनिष्ठ कार्यप्रबंधक जे.व्ही . चौधरी , पी.एस . चौधरी , एस टी . पाटील कामगार प्रतिनिधी एस आर पाटील , मनिष महाले , सुधीर गुरचळ , आदी उपस्थित होते .
याप्रसंगी मनिष महाले यांनी आपण आता खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेत असल्याने गुणवता वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले , तर सुधीर गुरचळ यांनी कार्यात काळानुसार बदल करून उत्कृष्ठ उत्पादन करण्याचे आवाहन केले , एस आर पाटील यांनी आपल्याकडे कुशलता , मशीनरी , सर्व आहे त्यांचा उपयोग करून ग्राहक संतुष्टी लक्ष गाठायचे आहे ,
महाप्रबंधक एस चटर्जी यांनी संवाद मध्ये सांगितले कि वरणगांव आयुध निर्माणीला वर्ल्ड क्लास बनविण्याचा माझा मानस आहे , उत्पादन करतांना गुणवत्ता , कमी खर्च , झिरो रिजेक्शन या विषयाकडे लक्ष दयावे कारण आपला ग्राहक हुशार झालेला आहे , आपले प्रॉडक्ट इतर कंपनी बनविण्यास तयार आहे , परिवर्तन करण्याची वेळ आली आहे , हवा , विज ,सामुग्री , टुल्स , आदींचा . वापर व्यवस्थीत करावा , तरच आपले भविष्य उज्वल आहे . आपण आता जागतिक स्पर्धेत आहे .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अप्पर महाप्रबंधक राजीव गुप्ता यांनी केले. आभार .परवेज शेख यांनी मानले , याच प्रकारे संवाद कार्यक्रम केस शॉप , बुलेट , लोडिंग , प्रायमर फिलींग आदी विभागात घेतला जात आहे