Saturday, October 1, 2022

जागतिक स्तरावरील ऑनलाईन घरगूती गणेशोत्सव लोक आरास स्पर्धा -2020

- Advertisement -

जागतिक स्तरावरील ऑनलाइन
घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा
वर्ष – 1 ले

- Advertisement -

● प्रथमच भव्य आरास स्पर्धा
● आकर्षक बक्षिसे
● सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक ईप्रमाणपत्र
● भव्य ऑनलाइन पारितोषिक वितरण
● देश परदेशातूनही होणार सहभाग

- Advertisement -

- Advertisement -

गणपती हे महाराष्ट्राच आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा! अंत्यत श्रध्देने आणि मोठ्या भक्तीभावाने हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या बरोबरीने महाराष्ट्रात घरोघरीही बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापुर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. आता प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे, मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे,  आकर्षक मखर असो, वा गणेशाची सुंदर मुर्ती! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते. घरगुती गणपतींना होणारी ही सजावट लक्षात घेता लोकशाही समूहाच्या वतीने यावर्षा पासून घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा हा उपक्रम हाती घेतला आहे.

या स्पर्धेतील प्रवेश विनामूल्य आहे. सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल, त्यासाठी फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घरात गणपतीभोवती केलेल्या सजावटीचा दोन ते अडीच मिनिटांचा व्हिडीओ आणि दोन फोटो आमच्याकडे पाठवायचे  आहे. एक गणपतीच्या मूर्तीचा आणि दुसरा आरती करतानाचा असे दोन फोटो आणि व्हिडीओ पाठवायचा आहे.

येणार्‍या सजावटींमधून सर्वोत्तम सजावटींना पारितोषिक देऊन सन्मानित केले जाईल.

सर्वोत्तम सजावट दोन पध्दतीने निवडले जाईल

1. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील  तज्ज्ञ सर्व व्हिडीओ चे परीक्षण करतील आणि पहिल्या तीन सर्वोत्तम सजावटीची निवड करतील. यासाठी काही प्रकारांमध्ये गुणांकन दिले जातील. जसे रोषणाई, सजवटीमधून जाणारा संदेश, मूर्ती, व्हिडीओ क्वालिटी, परिवारातील सदस्यांचा सहभाग, ऑडियो वगैरे


2. सर्वात जास्त व्ह्यू, लाईक, कॉमेंट आणि शेअर मिळवणार्‍या व्हिडिओला लोकप्रिय आरास म्हणून पारितोषिक देऊन सन्मानित केले जाईल.

पहिले पारितोषिक : 5000 /-
दुसरे पारितोषिक  : 3000 /-
तिसरे पारितोषिक : 2000/-

 लोकप्रिय आरास

पहिले पारितोषिक : 3000/-
दुसरे पारितोषिक  : 2000/-
तिसरे पारितोषिक : 1000 /-

सहभागी प्रत्येक सदस्याला देखील ई-प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार
चला तर मग!! होऊन जाऊ द्या घरातली सजावट एकदम जोरदार !!

स्पर्धेचे नियम आणि अटी
 स्पर्धेचा सहभाग सर्वांना खुला आणि विनामूल्य असेल.  
प्रत्येक स्पर्धकाने फक्त आपल्याच घरातल्या सजावटीचा या वर्षी चा दोन ते अडीच मिनिटांचा व्हिडीओ आणि फोटो पाठवायचा  आहे.
 स्पर्धकाला प्रत्येकी एक व्हिडिओ आणि 2 फोटो पाठवता येईल. (एक गणेश मूर्ती आणि दुसरा आरतीचा फोटो असावा)
सहभागी सर्व स्पर्धकांना ईप्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम  निवडण्याचा अंतिम निर्णय परिक्षकांकडे राहील.
 स्पर्धेसाठी आलेले सर्व व्हिडीओ लोकलाईव्ह चॅनल वर प्रसारित करण्यात येतील.  
अस्पष्ट, अंधुक किंवा कोणताही व्हिडीओ प्रसारण करण्यापासून रोखण्याचा अधिकार संपादक मंडळ आणि स्पर्धा समन्वय समितीचा राहील.  कोणत्याही स्पर्धकाच्या घरी लोकशाही समूहाचे प्रतिनिधी जाऊन सजावटीचे परीक्षण करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील.  
27 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत आलेले व्हिडीओ आणि फोटो स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येतील.
 जसजसे व्हिडीओ प्राप्त होतील तसतसे लोकलाईव्ह चॅनल द्वारे प्रसारीत केले जातील.
 30 ऑगस्ट पर्यंत सर्व व्हिडिओ चे व्ह्यु, लाईक, शेअर यांचे मूल्यांकन केले जाईल

स्पर्धेच्या निकालाबाबत सर्व अधिकार परीक्षक यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहे.

स्पर्धेच्या अटी शर्ती मध्ये बदल करण्याचा अधिकार संपादक मंडळ आणि स्पर्धा समन्वय समिती कडे आहे

स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून फॉर्म भरावा आणि सोबत  व्हिडीओ आणि फोटो फक्त या फॉर्म द्वारे पाठवावे https://forms.gle/BKA1KikbX35JVgqz7

अधिक माहितीसाठी व्हाट्सएप द्वारे संपर्क साधा : रोहित बारी 9096208099

- Advertisement -
spot_imgspot_img

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या