नवी दिल्ली : भारतीय नेमबाज इलावेनिल वलारिवानने गुरूवारी आयएसएसएफ वर्ल्ड कप फायनल नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मी. एअर रायफल प्रकारात २५०.८ गुणांसह सुवर्णपदक पटकावले.
Congratulations to Elavenil Valarivan fir winning yet another gold medal for India in women's 10m air rifle competition in #ISSFWorldCupFinal.
India is proud of your achievement. pic.twitter.com/9SdRA03VbN
— Poonamben Maadam (@PoonambenMaadam) November 21, 2019
स्पर्धेत चायनीज तैपईच्या लीन यिंग शिनला रौप्य तर रोमानियाच्या लाॅरा जार्जेटा काॅमनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारताची मेहूली घोष १६३.८ गुणांसह ६ व्या स्थानावर राहिली. आयएसएसएफ वर्ल्ड कप फायनलमधील इलावेनिलचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. यापूर्वी, २००३ मध्ये वर्ल्ड कप फायनल स्पर्धेत महिलांच्या १० मी. एअर रायफलमध्ये अंजली भागवतने सुवर्ण जिंकले होते.