जागतिक अंतराळ सप्ताह निमित्ताने वेद अकॅडमित विविध स्पर्धांचे आयोजन !

0

भडगाव (प्रतिनिधी) : जागतिक अंतराळ सप्ताह हा दरवर्षी ४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या काळात जगभर साजरा केला जातो. यूनाइटेड नेशन्स द्वारे च्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

याच निमित्ताने भडगाव शहरातील वेद अकॅडमी येथे या सप्ताहात स्पर्धा आयोजित करून नुकताच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात पोस्टर मेकिंग आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ. रेखाताई सामंत, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.दीपक मराठे तसेच मानवराज प्रतिष्ठान चे संस्थापक मा.निलेश मालपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा सप्ताह साधारणतः जगभरातील ५० देशात साजरा करतात. मुलांमधे अंतराळ विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यात त्यांना करियर करता यावे यासाठी आणि त्यांच्या कुतूहलाचे शमन व्हावे यासाठी हा सप्ताह साजरा करतात.

वेद अकॅडमी मधे झालेल्या स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवला. त्यात पोस्टर मेकिंग या स्पर्धेत तृतीय क्रमांक श्रुती राठोड, द्वितीय क्रमांक सुप्रिया पाटील आणि प्रथम क्रमांक ऋतुजा हिरे यांनी पटकावला. आणि निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक नीलेश पाटील, द्वितीय क्रमांक साहील हिरे आणि प्रथम क्रमांक मयुरेश बावीस्कर या विद्यार्थ्यानी मिळवला.विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.  उत्कृष्ठ प्रकल्प बनवल्याबद्दल प्रणव देव आणि विराज मोराणकर या विद्यार्थ्यांचे मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमाला पालकांनी देखील उपस्थिती लावत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

सदर कार्यक्रम संपन्नतेसाठी प्रा. नेहा मालपूरे आणि प्रा. यामिनी पाटिल यानी अथक परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.