Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    • फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या
    • मुलींना जन्मापासून 18 वर्षांपर्यंत मिळणार रु. 1.01 लाख
    • अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
    • प्रवासी बस उलटटून थेट खड्यात : 12 प्रवाशांचा मृत्यू
    • तिला रोखण्यासाठी थेट गाडीच्या बोनेटवर मारली उडी अन्…
    • वाराणसीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जांभोऱ्यातील नवनियुक्त सरपंचाचा अपघातात मृत्यू
    जळगाव

    जांभोऱ्यातील नवनियुक्त सरपंचाचा अपघातात मृत्यू

    By March 16, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल । धरणगाव तालुक्यातील जांभोऱ्यातील नवनियुक्त सरपंच विशाल चव्हाण यांचे एरंडोल कासोदा रस्त्यावर खडकेसिम गावाजवळ अपघाती निधन झाले. दर्दैवी असे की, १५ फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवडून आले अन १५ मार्च रोजी अपघाती निधन झाल्याने त्यांच्या आली अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    विशाल प्रकाश चव्हाण यांना १५ तारीख शुभ ठरल्यामुळे ते १५ फेब्रुवारी रोजी जांभोरा ग्रामपंचायतींचे सरपंचपदी बिनविरोध निवडून आले. परंतु दुर्दैव असे की १५ मार्च या तारखेला रात्री ११:३५ वाजेच्या सुमारास त्यांचे अपघाती निधन झाल्याने १५ तारीख यावेळी त्यांना अशुभ ठरली असा हा विचित्र योगायोग व असा हा शुभ व अशुभ घटनांचा क्रम सर्वांना अवाक करणारा ठरला आहे.

    जांभोरे तालुका धरणगाव येथील विशाल प्रकाश चव्हाण हे हे चारचाकी वाहनाने पाचोरा येथे त्यांच्या भावाला घ्यायला गेले होते. परतीच्या प्रवासात कासोदा एरंडोल दरम्यान स्विफ्ट गाडीचे खडके सिम गावाजवळ पेट्रोल संपले. त्यामुळे ते गाडीतून बाहेर आले असता मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या एम.एच.१८ ए. ए.५१२० क्रमांकाच्या पीक अप गाडीने धडक दिली. त्यात विशाल प्रकाश चव्हाण यांचा करुण अंत झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ते युवा सेना उप तालुका प्रमुख म्हणुन काम पाहत होते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे जांभोरा परिसरात शिवसेनेचे मजबूत संघटन उभारण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ते कट्टर समर्थक होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी, तीन वर्षाची एक मुलगी व नऊ महिन्यांची गर्भवती पत्नी असा परिवार आहे.

    याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला पीक अप गाडी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम प्रकाश चव्हाण यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भाग ५ गु.र. नं.३९/२१ भादवी कलम ३०४(अ)२७९,३३७,३३८ मो. व्हे.ॲक्ट १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र तायडे, संदिप सातपुते व अकील मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

    August 16, 2026

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif