जवानाचा पत्नीला जाळून मारण्याच्या प्रयत्नात चिमुकलीचा करूण अंत

0

घटनेनंतर जवानाची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या ; अमळनेरकरांचा थरकाप उडविणारी घटना

अमळनेर ;- येथील सेवानिवृत्त जवानाने पत्नीला ठार मारण्याच्या प्रयत्नात तिच्यावर चाकू हल्ला करून पेटवून देण्याचा प्रयत्न असफल झाल्याने त्याने मालगाडीखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी येथे उघडकीस आली असून मात्र पती पत्नीच्या झटापटीत ५ वर्षांची चिमुकली गंभीररीत्या भाजली जाऊन तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येथे घडली . या थरारक घटनेमुळे अमळनेरात खळबळ उडाली असून आठवड्यात अमळनेरकरांना धक्का पोहचविणारी हि दुसरी घटना असल्याने नागरिक धास्तावले आहेत .

याबाबत सविस्तर माहिती अशी कि , येथील प्रताप मिल कंपाउंड परिसरातील अनिल खैरनार (वय ३८) याने आज पहाटे ४ त्याची पत्नी अनिता खैरनार (वय ३३) गळ्यावर चाकूने वार केला. त्यानंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून जाळण्याचा प्रयत्न केला. आई जळत असल्याचे पाहून मुलगी तनुजा (वय पाच) हिने मिठी मारल्याने तीही गंभीर भाजली.त्यानंतर अनिल खैरनारने डुबकी मारोती मंदिर परिसरात जावून भूसावळ सूरत रेल्वे मार्गावरून येणाऱ्या मालगाडी खाली झोकून देत रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांना घरातून धूर निघत असल्याचे दिसताच त्यांनी धाव घेतली असता अनिता खैरनार व त्यांची मुलगी भाजले होते.

घटनेनंतर दोघींना अमळनेरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरिता 42 टक्के तर तनुजा 90 टक्के भाजल्याने प्रथमोपचार करून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे सरितावर उपचार करण्यात आले. तिच्या गळ्याला 20 टाके पडले असून तिथे धुळे पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. यानंतर दोघांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले,

मात्र पाच वर्षीय तनुजाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अनिल खैरनार लगेचच घरातून पसार झाला व त्यानं रेल्वे मालगाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केली. अनिल खैरनार हा माजी सैनिक असून दुसाने (ता. साक्री) येथील मूळ रहिवासी आहे. तर सरिता खैरनार हिचे दहिवद ता अमळनेर येथील माहेर आहे त्याचे दूमजली घर असून दूस्ऱ्या मजल्याचे बांधकाम सूरू आहे काहि दिवसांपूर्वी तो सैन्यदलातून सेवा निवृत्त झाला होता

Leave A Reply

Your email address will not be published.