शिरुड ता अमळनेर (रजनीकांत पाटील)-जवखेडा येथील श्री दत्त गादीपीठाचे आचार्य श्री संतोषपुरी गुरू बाळपुरी महाराज यांचे दि.१४ रोजी दुपारी ३ वाजता नाशिक येथील दवाखान्यात वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले…
आचार्य गुरुवर्य संतोषपुरी महाराज विषयी माहिती..
जवखेडा आणि आनोरे दरम्यान शेतशिवारातील टेकडीवर असलेले दत्त मंदिर…याच जागेवर स्व.आचार्य तुळशीपुरी महाराजांनी १९१३ ला झोपडीवजा कुटीयारुपी मंदिरांची स्थापना केली.त्यांच्याआधी स्व.आचार्य सैलापुरी महाराजांनी याच जागेवर पादुकापुजन करुन कुटीया उभारली होती.अशी अख्खाईका आहे.जंगलातील याच टेकडीवरून तुळशीपुरी महाराजांनी जवखेडावासीयांना अध्यात्माचे धडे गिरवले..पुढे स्व.बाळपुरी महाराजांनी १९६१ मध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातच मंदिराची स्थापना करुन आचार्य संतोषपुरी महाराजांनीं १९६९ ला दिक्षा घेतली अन् तेथुनच गावात दररोज सकाळी प्रभातफेरी व अभंगाचे सुर घुमू लागले.व दरपोर्णिमेला रात्री पुजापाठही होऊ लागली. दत्तजयंतीला मोठा उत्सव होऊ लागला.
अख्खे गाव दत्तमार्गीमय झाले.परिणामी दारु ,मांसाहार गावातून हद्दपार झाले..पुढे आचार्य संतोषपुरी महाराजांच्या मार्गदर्शनाने व गावकऱ्यांच्या सहकार्याने १९९५ ला बसस्थानक परिसरातच भव्यदिव्य श्री गुरुदेव दत्त गादीपीठ मंदिर उभारण्यात आले..नित्यनेमाने अध्यात्मिक शिकवण देता देता पूर्ण गाव त्यांनी दत्तमार्गी केले . “ना दारू ना मास जवखेडा करांचा असाही ध्यास” ही संकल्पना अमलात आणली.. गावात मांस विक्री, मद्य प्राशन या गोष्टी त्यांनी गावातून त्यांच्या अध्यात्मिकतेच्या शिकवणीतून हद्दपार केल्यात..लहानांपासून मोठ्यांपर्यंत अध्यात्मिकतेचि गोडी रुजवली…दत्तमार्गी व्यक्ती एकमेकांना “जयप्रणाम” म्हणू लागले…पुर्वी असलेल्या टेकडीवरील मंदिराच्या जागेवर जीर्णोद्धार करून मंदिर उभारण्याचा संकल्प संतोषपुरी महाराजांनीच जवखेडावासीयांजवळ मांडला अन् तो गावकऱ्यांच्या सहकार्याने व तालुक्यातील, जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी व दानशूर भाविकांच्या देणगीरूपी मदतीतून २००३ ला या जागेवर जीर्णोद्धार करून टुमदार मंदिर उभारले..अन् तेथेही पुन्हा पुजाविधी होऊ लागली..दर पौर्णिमेला पुजा ही होऊ लागली.. वयोमानाने संतोषपुरी महाराजही थकलेत…
गेल्या ७ वर्षपुर्वी बालबह्मचारी सनंदनपुरी महाराजांनी गावातील मंदिरावर दिक्षा घेतलीय..तेच सध्या महाराजांची काळजी घेत आजच्या तरुणाईला अध्यात्मिकतेचे धडे देताय..त्यांनी लावलेली शिस्त वाखाणण्याजोगीच आहे…मात्र आजच्या या कोरोना काळ जर नाही राहिला असता तर गुरुकुळ बंधू व मोठा भाविक वर्ग अंत्यसंस्कारला लोटला असता..त्याचा आज रात्री उशिरा ११ वाजता कोरोनाचे नियम पाळत जवखेडा गावापासून असलेल्या कैलास टेकडीवरील मंदिर परिसरात होत आहेत…
महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली…
गुरुवर्य श्री संतोषपुरी महाराजांचे मूळ गाव शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे होते .ते इंग्रजीचे पदवीधर होते..त्यांनी पोस्ट खात्याची नोकरी सोडून अध्यात्मिक मार्ग पत्करला होता जवखेड्यातील तत्कालीन अनेक तरुणांना (आज ते सेवानिवृत्त झाले आहेत काही होतंयत) त्यांनी नोकरीसाठी मार्गदर्शन करत त्यांच्या प्रापंचिक समस्या ही सोडविली आहे..त्यांनी भाविकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने आज जवखेडा वासीयांचा “गुरुमाऊली” च गेल्याने सर्व पोरके झाल्याचे दिसत आहे…