जळगाव शहर पाणी पुरवठा योजनेचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

0

अमृत अभियानातंर्गत अडीचशे कोटी रुपयांच्या खर्चाची योजना

जळगाव;- केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानातंर्गत राबविण्यात येत असलेल्या 249 कोटी 16 लाख रुपये खर्चाच्या जळगाव शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन शुक्रवारी (दि.30) दुपारी 2 वाजता भाऊंचे उद्यान, काव्यरत्नावली चौक येथे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी कृषी, फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा ,वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जा व नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील, माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे, माजीमंत्री सुरेशदादा जैन, खासदार ए. टी. (नाना) पाटील, खासदार रक्षाताई खडसे डॉ. सुधीर तांबे, डॉ. अपूर्व हिरे, स्मिताताई वाघ, चंदुभाई पटेल, डॉ. सतीश पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, उन्मेष पाटील, किशोर पाटील, नगरविकास विभागाच्या
प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी व आयुक्त्‍ किशोर राजे निंबाळकर, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांची उपस्थिती विशेष उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, स्थायी समिती सभापती श्रीमती ज्योती इंगळे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती प्रतिभा कापसे, सभागृह नेता नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेता वामनराव खडके यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.