जळगाव शहरात १९ रोजी मुख्यमंत्र्यांची सभा

0

जळगाव –
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी.आय.(आ.), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे जळगाव लोकसभेचे अधिकृत उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा 19 रोजी दुपारी 3 वाजता सागर पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेली आहे.
प्रचार आता अंतिम टप्प्यात सुरु झाला असून आता मोठमोठ्या सभा महायुतीच्या उमेदवारासाठी मोठ मोठ्या नेत्यांच्या सभा सुरु झाल्या आहेत. यात मुख्यमंत्र्यांची सभा जळगाव शहरात होत आहे. लोकसभेचे अधिकृत उमेदवार उन्मेष पाटील यांनी 4 – 5 दिवस जळगाव शहर / ग्रामीण भागात प्रचार रॅलीत घेतली. ते ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेत असून विविध संघटनांचा पाठिंबा भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील यांना मिळत आहे. मुख्यमंत्री यांची सभा जळगाव शहरात होणार असल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात मोठ्या प्रमाणात उत्साह असून सदर सभेच्या तयारीला लागलेले आहेत.
या सभेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील,जलसंपदामंत्री गिरीश महाजन ,सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ. एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुरुमुख जगवाणी, जि.प.अध्यक्षा उज्वलाताई पाटील, महापौर सीमाताई भोळे, डॉ.राजेंद्र फडके, अ‍ॅड.किशोर काळकर, संजय सावंत, खा.ए. टी. नाना पाटील, खा.रक्षाताई खडसे, आ.सुरेश (राजूमामा) भोळे,भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, आ.स्मिता वाघ, आ.हरिभाऊ जावळे, आ.संजय सावकारे, मा.आ.चैनसुख संचेती, मा.आ.चंदूभाई पटेल, मा.आ.किशोर अप्पा पाटील, मा.आ.शिरीषदादा चौधरी मा.आ.चंद्रकांतजी सोनवणे, माजी आ.चिमणआबा पाटील, मा.श्री. आनंदजी खरात, मा.रमेश मकासरे, मा.रवी पवार(जिल्हाध्यक्ष, रासप), मा. अ‍ॅड.दिलीप पोकळे (शिवसंग्राम) हिम्मतसिंग पाटील (जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना), मा.शरद तायडे, शिवसेना प्रमुख, डॉ.अश्विनभाऊ सोनवणे (उपमहापौर, जळगांव), सभापती, मनपा श्री.जितेंद्र मराठे, सौ.मंगलाताई चौधरी, मनपा गटनेते श्री.भगतभाई बालानी, सभागृह नेते, मा.सुनीलभाऊ महाजन. अनंत जोशी, मा.ललीतभाऊ कोल्हे, मा.नितीन लढ्ढा, मा.आबा कापसे, मा.कैलास सोनवणे आदि मान्यवर उपस्थित राहणार असून सदर या प्रचंड जाहीर सभेला महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोकसभा संयोजक पोपटतात्या भोळे, दीपक सूर्यवंशी, जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.