जळगाव शहरात जोरदार सरींसह पावसाची हजरी

0

जळगाव प्रतिनिधी:-  शहरात शुक्रवार, दि. ४ जून रोजी साडेचार व पाच च्या सुमारास जोरदार सरींसह पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. जवळपास अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही वेळासाठी दिलासा मिळाला.

शहरात शुक्रवारी दुपारपासून गरम होत असल्याचे दुपार नंतर  ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पावसाने हजेरी लावली. काही वेळानंतर पावसाचा जोर कमी झाला. यानंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जवळपास पाऊणतास हा पाऊस सुरु होता. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरील सखल भागात पाणी डबके भरून दिसले

Leave A Reply

Your email address will not be published.