जळगाव ;- शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्षांच्या माध्यमातून जळगाव शहराचे विविध प्रलंबित विषयांवर मुख्यमंत्री व संबधित विभागाच्या मंत्र्यांना सहकार्य मिळण्यासाठी जळगाव शहरातील समस्या मांडल्या.
यात जळगाव शहर हे राज्याचे मध्यवर्ती शहर असून रेल्वे सेवा, वाहतूक, विमानसेवा व पुरेसे पाणी या सगळ्या सोयी व दळणवळणाचे सर्व सुखसोयी असतांनासुद्धा जळगाव शहरातील औद्योगिक विकास झालेला नाही किंवा मोठे उद्योग व्यवसाय आलेले नाहीत किंवा मोठे उद्योग व्यवसाय जळगाव शहरात आलेले नाहीत. तरी शहरांतील सुशिक्षित बेरोजगार युवकांना पुणे, मुंबई, नाशिक या शहरात जावे लागते ही जळगाव शहराची मोठी शोकांतिका असून जळगाव शहरात एम.आय.डी.सी. तील नवीन उद्योगवाढीसाठी संबधित विभागाच्या मंत्री महोदयांनी प्रयत्न करावे व स्थलांतरित होत असलेल्या बेरोजगार युवकांसाठी प्रयत्न करावेत.
तसेच पोलीस प्रशासन हे जनतेची कायदा सुव्यवस्था राखण्याचे अती महत्वाचे कार्य बजावत असते. परंतु त्यांच्या समस्या सोडविणे हे लोकप्रतिनिधी या नात्याने माझे कर्तव्य असल्याने पोलीस बांधवांना सद्यस्थितीतील ३० ते ३५ वर्ष झालेले असून या घरात पोलीस बांधवांचे कुटुंब वास्तव्यास असून या ते अतिशय लहान घरात त्यांना राहणे अतिशय अडचणीचे होत असून ते आजच्या स्थितीत जीर्ण झालेले आहेत. तरी पोलीस बांधवांना नवीन सुसज्ज पोलीस वसाहत इमारत व्हावी यासाठी संबधित विभागाच्या मंत्र्यांना विनंती केली.
जळगाव शहरातील ५ लाखावर लोकसंख्या असून जळगाव महानगर पालिके तर्फे जळगाव वासियांना कुठल्याच प्रकारच्या मुलभूत सुविधा ६० टक्के जनतेपर्यंत मिळत नसून याला मुख्य कारण म्हणजे हुडकोचे कर्ज असून हे कर्ज माफ होण्यासाठी किंवा याविषयी मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री मा.ना.चंद्रकांतदादा पाटील, जिल्ह्याचे नेते माजी मंत्री मा.आ.एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री मा.ना.गिरीश महाजन यांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून अथक प्रयत्न सुरु असून अध्यक्षांच्या माध्यमातून जळगाव शहराच्या ५ लाख जनतेच्या भावना लक्षात घेता हुडको कर्ज माफ होण्यासाठी सहकार्य करावे अशा भावना व्यक्त केल्या.