धरणगाव :-येत्या 23रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीचे उमेदवार उन्मेश पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणा असे आवाहन शिवसेनेचे उपनेते व सहकार राज्य मंत्री ना गुलाबराव पाटील यांनी विशाल सभेला संबोधित केले. ते म्हणाले की जळगाव मतदार संघात फक्त पारोळा मतदार संघ सोडला की संपुर्ण मतदार संघात भाजपा शिवसेना महायुतीचे आमदार, जि प.व पंस सदस्य तसेच ग्रामपंचायती सरपंच पासुन तर नगरसेवक व नगराध्यक्ष महापौर युतीचे आहेत म्हणुन लोकप्रतिनिधी सह कार्यकर्तेनी आपली जवाबदारी ओळखुन कार्य केल्यास उन्मेश दादा मोठ्या मतधिक्याने निवडून येथील असा विश्वास व्यक्त केला.
नुकताच येथील सानेपटागणावर भा.ज.पा.शिवसेना आर पी आय महायुती ची विजय संकल्प सभा संपन्न झाली त्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन सहकार राज्य मंत्री ना गुलाबराव पाटील बोलत होते. तर व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उमेदवार उन्मेश दादा पाटील, भाजपा चे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जिल्हा उपाध्यक्ष पी सी पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय महाजन, जि.प.सदस्य गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील, माधुरीताई अत्तरदे. माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, जिवन आप्पा बयस,उपनगराध्यक्षा अंजली ताई विसावे, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, जनाताई पाटील सह शहर प्रमुख राजेद्र महाजन, सह भाजपा शिवसेना चे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन सरकारने राबविलेल्या विविध योजना अंतर्गत माहीती देऊन देशाचा सुरक्षा साठी फिरसे मोदी सरकार नारा दिला कार्यक्रम चे सुत्रसंचालन नगरसेवक कैलास माळी सर, व आभार पी. एम पाटील सर यांनी मानले. प्रसंगी असंख्य कार्यकर्ते व नागरीक सभेत सहभागी होते. सकाळी 9वा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पासुन ना गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती भव्य रॅली शहराचा विविध भागातुन काढण्यात आली त्यात असंख्य कार्यकर्ते व नागरीक सहभागी झाले होते हर हर मोदी चा घोषणा देऊन वातावरणाची निर्मिती करण्यात आली.