आ.स्मिता वाघ ऐवजी आ. उन्मेश पाटलांना उमेदवारी देण्याच्या हालचालींना वेग
आ. उन्मेश पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार
दिवसभर जिल्हाभरात भाजप उमेदवारी बदलाची चर्चा
राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचा भाजपने घेतला धसका?
भाजप कार्यालयात दिवसभर शुकशुकाट
जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते संभ्रमात
चाळीसगावात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष!
जळगांव-
जिल्हयात एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारा विरूद्धच पक्षामधूनच नव्हेतर सहकारी पक्षाकडूनसुद्धा बंडखोरी करून अर्ज दाखल करण्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. त्यात संकटमोचन असणारे ना.गिरीष महाजन यांना स्वजिल्हयातच सहकार्यांची अजीजी करावी लागत असल्याचे चित्र निवडणूका जाहिर झाल्या दिवसां पासून सुरू आहे. ते अद्याप थांबण्याचे चिन्ह नाही. बुधवार 3 रोजी आ. उन्मेष पाटील यांचे तर्फे दायमा यांनी उमेदवारी अर्ज नेलेअसून त्यांच्या उमेदवारी विषयी घटनांना वेग आला असून दिवसभर अनेक ठिकाणी जळगांव लोकसभेसाठी भाजपात स्मिता वाघ यांच्या ऐवजी आ. उन्मेष पाटील यांचे नाव जवळजवळ निश्चित झाल्याचे सांगीतले जात आहे. या घटनांनी कार्यकर्ते मात्र संभ्रमात असून प्रचार कोणाचा करावा यातुन त्यांचा जोष मावळत असल्याचे चित्र आज भाजपा कार्यालयासह ना, गिरीष महाजनांच्या संपर्क कार्यालयाभोवती दिसून आले. तर नंदुरबार लोकसभा मतदार संघातसुद्धा डॉ.हिना गावीत यांच्या ऐवजी डॉ. सुहास नटावदकर यांच्या कन्येला उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात होती.
अच्छे दिन आयेंगे म्हणणार्या भाजपालाच त्यांच्या बालेेकिल्ल्यात उमेदवार बदलाच्या हालचालींमुळे यावर्षी मोदी लाट नसली तरी भाजपने दिलेला उमेदवार निवडून येतो हा समज साफ खोटा ठरण्याची किमया या उमेदवारी बदलाच्या हालचाली मुळे होउ शकते. विद्यमान खा.ए.टी.पाटील, अपक्ष आ. शिरीष चौधरी, शिवसेना जि.प.सदस्य पदमसिंग पाटील आदी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या वृत्तामुळे विरोधी उमेदवारांचे मनोबल उंचावले असून त्यांची एकप्रकारे विजयाकडे वाटचाल सूरू झाली असून गुलाबराव देवकरांनी आजच गुलाल टाकुन घ्यावा असे सर्वत्र ग्रामीण भागात बोलले जात आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्यापुर्वीच अनेकांनी आपणच उमेदवार हि अटकळरनुसार कार्यकर्त्यांची बांधणी करून कामाला देखिल लागले होते. परंतु ऐनवेळी युतीची व आघाडीची घोषणा होउन जिल्हयात सर्वप्रथम आघाडीने उमेदवार जाहिर केला. आणि त्या दृष्टिने भेटीगाठी व दिशा ठरवली गेली. नियोजन ठरले नुसार उमेदवारी अर्ज देखिल दाखल झाला. मात्र या उलट अच्छे दिन आर्येगे म्हणणार्या भाजपाला एका मतदार संघात तगउा उमेदवार देउन विरोधी पक्षाला मात्र सक्षम उमेदवार शोधणे अवघड झाले होते. त्याच्या अगदी विरूद्ध परीस्थिती जळगांव मतदार संघात आपल्याच घरातीलच नव्हे तर सहकारी पक्षांच्या अंतर्गत कुरबुरी वा वाद शमविणे भाजपा पदाधिकार्याना दिवसेंदिवस अवघड होउ लागले. रावेरसह जळगांव उमेदवार एकाच दिवशी अर्ज दाखल करण्याऐवजी तांत्रीक व भावनिक कारण देउन जळगांव उमेदवारी अर्ज एक दिवस उशीराने दाखल झाला.
वन बुथ टेन्टी युथ-सुक्ष्म बुथरचना
भाजपा जिल्हा कार्यालयात दोनही उमेदवारांचा प्रचार यंत्रणा सज्ज होउन कार्यकर्ते कामाला लागले देखिल. भाजपा जिल्हा कार्यालयात पक्षाकडून 4 जळगांवसाठी, 3 रावेरसाठी असे 7 प्रचार रथ दाखल झाले. हे प्रचार रथ येवून किमान पाच ते सात दिवसांपासून वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयासमोर उभे आहेत. या प्रचार रथांव्दारे एलईडि स्क्रीनसह अत्याधुनिक जिपीएस यंत्रणा कार्यरत असून थेट दिल्ली मुख्य कार्यालयात याचे प्रक्षेपण दिसणार आहे. अत्यंत हायटेक यंत्रणा, वन बुथ टेन्टी युथ अशी थेट ग्रामीण पातळीवर सुक्ष्म बुथरचना पदाधिकारी कार्यकर्ते यांची असून देखिल या वेळेस मात्र भाजपाच्या अभेद्य गडाला स्वगृहातच सुरूंग लागणार असल्याचे संकेत आहेत.