जळगाव : येथील महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. माधवी खोडे चवरे यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. माधवी खोडे-चवरे ह्या सध्या नागपूर येथे वस्त्रोद्योग विभागात संचालकपदी काम पाहत आहे.
मावळते आयुक्त उदय टेकाळे यांची सेवानिवृत्ती झाल्याने आयुक्तपद रिक्त झाल्याने राज्य शासनाने त्यांची जळगाव महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. डॉ. माधवी खोडे-चवरे ह्या २००७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यापुर्वी त्यांनी भंडारा आणि चंद्रपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, तर भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारीपद यशस्विरित्या संभाळले आहे.